Devendra Fadnavis : ‘राज्यात आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी दोघेच काम करत होतो. आता अजितदादा आमच्यासोबत आले आहेत. त्यामुळे असा एक त्रिशूळ तयार केला जो विकासाचा त्रिशूळ आहे. जो त्रिशूळ या महाराष्ट्रातील गरीबी दूर करेल, जो त्रिशूळ या महाराष्ट्राचं मागासलेपण दूर करेल, जो त्रिशूळ शंकरासारखा आहे भोळादेखील आहे पण, जे लोक या महाराष्ट्रात जनसामान्यांच्या विरोधात काम करतील त्यांच्याकरता तिसरा डोळा बनून त्यांना खाक करणारा त्रिशूळ आमच्या तिघांच्या माध्यमातून पहायला मिळेल’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे सरकारमध्ये स्वागत केले आणि विरोधकांना खणखणीत इशारा दिला.
‘पांडुरंगाच्या दारात सांगतो, भुजबळांचा पराभव करणारच’ राऊतांचं थेट चॅलेंज!
गडचिरोली येथे आज शास आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी नागरिकांच्या हितासाठी घेतलेले निर्णय सुरू केलेल्या योजना यांची माहिती देण्याबरोबरच विरोधकांवर फडणवीस यांनी जोरदार टीका केली.
ते म्हणाले, गडचिरोलीत विमानतळ सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. ते करणार. घरेही देणार आहोत. या जिल्ह्यात मायनिंग प्रोजेक्ट सुरू करणार आहोत. पण हे करताना जिल्ह्यातील निसर्ग संपदा, पर्यावरणाला कोणताच धक्का लागणार नाही याची ग्वाही देतो. जिल्ह्याचा विकास करण्यासाठी राज्य सरकार आगामी काळात आणखीही काही योजना सुरू करणार आसल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने कोणत्या योजना सुरू केल्या आहेत याचीही माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.
‘मी टायर्ड नाही, रिटायर्डही नाही’; दौरा सुरू होण्याआधीच पवारांनी अजितदादांना डिवचलं!
अजितदादांचा हटके उल्लेख..
शासन आपल्या दारी कार्यक्रमात व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस बसले होते. भाषण करण्यासाठी फडणवीस उठले. भाषण सुरू करण्याआधी त्यांनी व्यासपीठावरील उपस्थितांच्या नावांचा उल्लेख केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नेहमीप्रमाणेच उल्लेख केला. मात्र, अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख करताना ‘आमचे नूतन साथी, जुने मित्र अन् नुकतेच सरकारमध्ये आलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार.’असा उल्लेख फडणवीस यांनी केला.