Download App

‘आमचं आरक्षण त्यांन देऊ नका, अन्यथा…’, सरकारने जीआर काढल्यानंतर कुणबी समाज आक्रमक

  • Written By: Last Updated:

Maratha Reservation : मराठा समाजाला कुणबी समाजातून (Kunbi community) आरक्षण देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतल्यानं आता कुणबी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाला ओबीसी आरक्षण (OBC reservation) देऊ नक, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी या प्रकरणी शनिवारपासून लाक्षणिक उपोषण सुरू करून आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

https://www.youtube.com/watch?v=Qbcr-Nl3sTI

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या आंतरवली सराटी गावात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला राज्यभरातून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळं राज्य सरकारने या आंदोलनापुढे नमते घेत मराठी समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण देऊ केले. यासंदर्भात सरकारने एक जीआरही जारी केला आहे. आता यावर कुणबी समाजाने आक्षेप घेतल्याने सरकारची चौफेर कोंडी होण्याची शक्यता आहे.

माजी मंत्री सुनील केदार, अखिल कुणबी समाजाचे अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी नागपुरात बैठक झाली. या बैठकीला कुणबी समाजातील सर्व पोटजातींचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्यास तीव्र विरोध करण्यात आला. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. महाराष्ट्र बंद पुकारला जाईल. आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधीचे निवेदन दिले असल्याचे शहाणे यांनी सांगितले.

सतेज पाटलांचे शब्द खरे ठरले! राजाराम कारखान्याचे 1272 सभासद अपात्रच… 

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका
यावेळी लेकुरवाळे म्हणाल्या, मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात आम्ही नाही. मात्र त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये. ओबीसी कोट्यात आधीच अनेक जाती आहेत. त्यामुळे यात मराठा जातीचा समावेश करणे तर्कसंगत नाही. सरकारने त्यांना वेगळे आरक्षण द्यावे. त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास तीव्र विरोध केला जाईल.

कुणबी समाजाची बैठक शुक्रवारी
कुणबी समाजाच्या आंदोलनाची पुढील रणनीती ठरविण्यासाठी शुक्रवारी जाहीर बैठक बोलावण्यात आली आहे. त्यानंतर शनिवारपासून संघटनेच्या जुनी शुक्रवारी परिसरातील संघटनेच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे शहाणे यांनी सांगितले.

Tags

follow us