सतेज पाटलांचे शब्द खरे ठरले! राजाराम कारखान्याचे 1272 सभासद अपात्रच…

सतेज पाटलांचे शब्द खरे ठरले! राजाराम कारखान्याचे 1272 सभासद अपात्रच…

Kolhapur News : कोल्हापुरातील महाडिक गटाला मोठा धक्का बसला आहे. राजाराम सहकारी साखर कारखान्यातील 1272 सभासद अपात्र ठरले आहेत. यासंदर्भात साखर कारखाना सहसंचालकांनी गुरुवारी निकाल दिला आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या साखर कारखाना निवडणुकीत महाडिक गटाने बाजी मारल्यानंतर मतदार यादीत 1272 सभासद अपात्र असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला होता. अखेर सहसंचालकांनी हे सभासद अपात्र ठरले आहेत. त्यामुळे आगामी काळात निवडणुकीत महाडिक गटासमोर मोठं आव्हान उभं राहणार असल्याचं बोललं जात आहे.

अटल बांबू समृद्धी योजना नेमकी आहे तरी काय? वाचा!

राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकूण 1 हजार 2336 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतदार यादीत अपात्र सभासदांचाही समावेश होता. म्हणजे नियमित 11 हजार सभासदांचे मतदान झाले होते. यापैकी 5000 ते 5500 मतं आमच्या आघाडीला मिळाली.

नांदेडात शिंदे पॅटर्न! काँग्रेसला धक्का देत बड्या नेत्यासह कार्यकर्ते शिंदे गटात

त्यामुळे खऱ्या सभासदांचा कौल आमच्या आघाडीला मिळाला होता हे सिध्द झाले आहे. या अपात्र सभासदांमुळे आमच्या उमेदवारांना 1200 ते 1250 मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला. जर हे अपात्र सभासद मतदानास पात्र झाले नसते, तर आज कारखान्यावर आमचीच सत्ता आली असती, असंही सतेज पाटील यांनी बोलून दाखवलं आहे.

दरम्यान, आम्ही सर्वसामान्य सभासदांच्या पाठबळावर निवडणुकीला सामोरे गेलो असून अपात्र सभासदांची नावे मतदार यादीत नसते तर सत्याचा विजय झाला आहे, असंही ते म्हणाले आहेत. आता सभासद अपात्र झाल्याने ही निवडणूक बेकायदेशीर असून फेर निवडणूक घ्या, अशी मागणी आमदार सतेज पाटील गटाने केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube