मनोज जरांगेंचं उपोषण मागे? अध्यादेश घेऊन खोतकर आंदोलनस्थळी, जरांगेंच्या शिष्टमंडळाला सरकारचं निमंत्रण…
अखेर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमदरण उपोषणापुढे सरकार नमलं असल्याचं दिसून येत आहे, राज्य सरकारच्यावतीने मराठवाड्यातील कुणबी मराठ्यांना कुणबी असल्याचे दाखले देण्यासंदर्भातील अध्यादेश घेऊन माजीमंत्री अर्जुन खोतकर आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. अर्जुन खोतकर आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा झाली असून राज्य सरकारच्यावतीने मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाला निमंत्रण देण्यात आलं आहे, जरांगे यांनीही हे निमंत्रण स्विकारलं असून आमचं शिष्टमंडळ अध्यादेशात सूचना सुचवणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.
Prakash Raj : भारत- इंडिया वादात प्रकाश राज यांची उडी; म्हणाला ‘तुम्ही फक्त…’
मराठवाड्यातील कुणबी मराठा समाजाच्या ज्या तरुणांच्य निजामकालीन नोंदी असतील त्या तरुणांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधी स्पष्ट केलं आहे. त्यानूसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यादेश काढला असून हाच अध्यादेश घेऊन माजी मंत्री अर्जुन खोतकरांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. तसेच निजामकालीन नोंदी असलेल्या मराठा तरुणांना कुणबीचे दाखले देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
‘मी गुवाहाटीला गेलो, बदनाम झालो, त्या बदल्यात ‘हे’ मिळालं’; बच्चू कडू पहिल्यांदा बोलले….
यावेळी चर्चेदरम्यान, अध्यादेशामध्ये काही बदल सुचवायचे असतील तर मनोज जरांगे यांच्यासह त्यांच्या शिष्टमंडळाला राज्य सरकारच्यावतीने निमंत्रणही देण्यात आलं आहे. जरांगे पाटील जे
शिष्टमंडळ नेमतील त्यालाही मंत्रालयात चर्चेसाठी घेऊन जाणार असून शिष्टमंडळ सांगतील तशा सूचना शक्य असेल तर आम्ही करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं ग्वाहीच अर्जुन खोतकरांनी दिलं आहे.
लाठीचार्जचे आदेश देणारे जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची काढली लाज
यावेळी राज्य सरकारने कबुल केलेल्या अध्यादेशासह तीन गोष्टी लेखी स्वरुपात मनोज जरांगे यांच्याकडे दिल्या असून जरांगे यांनीदेखील सरकारचं निमंत्रण मान्य केलं असून या प्रश्नावर दोन दिवसांत निर्णय होणार असल्याचं खोतकरांकडून सांगण्यात आलं आहे. तसेच आमचं शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा करण्यासाठी येईल, मराठा समाजाला न्याय मिळणार असून उपोषण सुरुच राहणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.
आरक्षण मिळविण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सुरु आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करण्यात येत असून आंदोलन सुरू असतानाच गुरुवारी सायंकाळी आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यावरून जोरदार गोंधळ उडाला. त्याचवेळी जोरदार दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत दहा ते बारा पोलिस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दगडफेकीनंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केला आहे. आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळालं.त्यानंतर राज्यभरात मराठा समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे.