लाठीचार्जचे आदेश देणारे जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची काढली लाज

Aditya Thackeray Eknath Shinde Fadnavis Ajit Pawar

Aditya Thackeray On Eknath Shinde : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी आदित्य ठाकरेंनी जालन्यामध्ये लाठीचार्जचे आदेश देणारे जनरल डायर कोण आहेत? असा सवाल उपस्थित केला. राज्य सरकारच्या आदेशाशिवाय लाठीचार्ज शक्यच नाही असा आरोपही यावेळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.

Maratha Reservation : मराठा Vs ओबीसी संघर्ष पेटल्यास सरकारची भूमिका काय? राहुल शेवाळेंनी सांगितलं

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लाठीचार्जचे आदेश दिले नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर राज्यभरात मराठा आंदोलन पेटले.

मुलीच्या प्रेमविवाहानंतर संपूर्ण कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; वडील अन् मोठ्या मुलाचा मृत्यू

त्यावरुन विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये थोडी जरी लाज उरली असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.

आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्यावेळी आंदोलन संवेदनशील असते, तेव्हा पोलिसांकडून सरकारला विचारल्याशिवाय लाठीचार्ज किंवा आंदोलकांना उठवायला जाणार नाहीत, हे मी खात्रीशीरपणे सांगू शकतो.

पोलीस आंदोलन उठवायला गेल्यानंतर आजूबाजूच्या कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे ती बिघडू शकते. ती बिघडू नये म्हणून पोलीस मुख्यमंत्र्यांकडून, गृहमंत्र्यांकडून आदेश घेतले जातात. आता यामध्ये सांगितलं जात आहे की, आम्ही आदेश दिलेच नाहीत.

असं जर असेल तर मग सरकार चाललंय कसं? त्यामुळे आम्ही राज्यपालांकडे भेटून त्यांना विनंती केली की, घटनाबाह्य मुख्यमंत्री जे आहेत त्यांना बोलवून जरा समज द्यावी की, प्रशासन चालतं कसं? आणि राज्य चालवतात कसं? द्यावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये थोडी जरी लाज उरली असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.

Tags

follow us