मुलीच्या प्रेमविवाहानंतर संपूर्ण कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; वडील अन् मोठ्या मुलाचा मृत्यू

मुलीच्या प्रेमविवाहानंतर संपूर्ण कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; वडील अन् मोठ्या मुलाचा मृत्यू

मुलीच्या प्रेमविवाहामुळे नाखूष असलेल्या एका दलित कुटुंबाने विष प्राशन करुन सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेत वडील आणि एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तर आई आणि एक मुलगा बचावला आहे. किरण राठोड (52) आणि हर्ष (24) अशी मृतांची नाव आहेत. तर पत्नी नीताबेन (50) आणि दुसरा लहान मुलगा हर्षिल (19) हे दोघे बचावले आहेत. (unhappy over their daughter’s love marriage, a couple and their two sons allegedly consumed poison)

याबाबत ढोलका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षापूर्वी किरण राठोड यांच्या मुलीने प्रेमविवाह केला. मात्र हा विवाह कुटुंबियांना आवडला नव्हता. तसंच तेव्हापासून मुलीच्या सासरच्या कुटुंबियांकडून राठोड कुटुंबियाला मानसिक त्रास देण्यात येत होता. त्यामुळे ते नैराश्येत होते. अखेर मंगळवारी चौघांनीही आत्महत्येचा निर्णय घेतला. विषारी द्रव्य प्राशन केले. शेजाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी रुग्णवाहिका बोलावून तातडीने पोलिसांना माहिती दिली.

‘इंडिया’त मिठाचा खडा! ‘या’ राज्यात काँग्रेसशी आघाडी नाही; ‘आप’ स्वबळावरच लढणार

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच किरण राठोड आणि हर्ष राठोड यांचा मृत्यू झाला होता तर नीताबेन आणि हर्षिल बचावले असून त्यांच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या आत्महत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी राठोड यांच्या मुलीचा पती, तिचे सासरे, इतर नातेवाईक आणि मित्रांसह 18 जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणे), 506 (2) (गुन्हेगारी धमकी), 114 (गुन्हा घडला तेव्हा प्रवृत्त करणारा उपस्थित) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

One Nation, One Election चा सरकारच्या तिजोरीवर भार पडणार? आयोगाने दिला हिशोब…

मिळालेल्या माहितीनुसार, या लग्नामुळे नाराज राठोड आणि त्याच्या कुटुंबाने आपल्या मुलीशी संबंध तोडले. तिला तिच्या सासरी भेटायला जाण्यास नकार दिला. यानंतर त्यांच्या मुलीच्या सासरच्या लोकांनी आणि इतर आरोपींनी राठोड कुटुंबियांचा मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. हाच छळ आणि बदनामी सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, असेही दाखल गुन्ह्यात म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube