Download App

एक नाहीतर 10 खासदार पाठवा, बच्चू कडू पडणार नाही; कडूंनी बावनकुळेंना ठणकावलं

Bachchu Kadu On Chandrashekhar Bawankule : एक नाहीतर 10 खासदार पाठवा, बच्चू कडू पडणार नसल्याचं प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू यांना पाडण्यासाठी भाजपने लक्ष घातलं असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. वाशिममध्ये दिव्यांग मेळाव्यात ते बोलत होते.

Sonu Sood: चाहत्याने मानले आभार! पुन्हा सोनू सूद देवासारखा धावून आला..

पुढे बोलताना कडू म्हणाले, एकीकडे आम्हाला सत्तेत या म्हणून सांगणार अन् दुसरीकडे काहीही करुन बच्चू कडूला पाडा, असा आदेश द्यायचा हे काही बरोबर नाही, मी बावनकुळेंना सांगतो, एक नाही तर 10 खासदार पाठवा, बच्चू कडू पडणार नसल्याचं ते म्हणाले आहेत.

Aatmapamphlet : ‘या’ कारणासाठी ललित प्रभाकर ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटवर गेला…

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी शिंदे गटाची वाट धरली. त्याआधी ते महाविकास आघाडीच्या काळात मंत्री होे. त्यानंतर मंत्रिपद मिळणार या आश्वासनामुळे बच्चू कडू यांनी शिंदे गटाला साथ दिली. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप रखडलेला असल्याने त्यांना अजून मंत्रिपद मिळालेलं नाही. त्यामुळे कडू यांनी नाराजीही व्यक्त केल्याचं समोर आलं होतं.

‘घाटी अन् नांदेड घटनेप्रकरणी सुप्रिया सुळे सरकारला घेरणार; ‘खटला दाखल..,’

गेल्या काही दिवसांपासून भाजपने अमरावतीत अधिकच लक्ष घातल्याचं दिसून येत आहे. भाजपला अचलपूरचा गड जिंकायचा असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे चार वर्षांपासून भाजपकडून अचलपूर मतदासंघात चाचपणी सुरु आहे. कडूंनी शिंदे गटाला साथ दिल्यापासूनच अचलपूर मतदारसंघावर भाजपचं लक्ष आहे.

Maratha Reservation: मनोज जरांगेची तोफ नगरमध्ये धडाडणार, ‘या’ दिवशी होणार सभा

यावर बोलताना कडू म्हणाले, एकीकडे आम्हाला सांगायचं की, सत्तेमध्ये या आणि दुसरीकडे मित्रत्व पाळायचं नाही हे असं भाजपचं सुरू आहे. काही करून बच्चू कडू पडला पाहिजे यासाठी हालचाली सुरू आहेत.

Uddhav Thackeray : ‘भाजप पक्ष नाही, ‘व्यापार केंद्र’; ठाकरे गटाची जळजळीत टीका

आपण यासंबंधी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना सांगितलं होतं की खासदार अनिल बोंडे यांच्याकडे लक्ष द्या म्हणून. आता मी त्यांना सांगतो, एक नव्हे तर 10 खासदार पाठवा, बच्चू कडू पडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, अद्याप चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसून बच्चू कडू यांच्या या वक्तव्यावर बावनकुळे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us