Uddhav Thackeray : ‘भाजप पक्ष नाही, ‘व्यापार केंद्र’; ठाकरे गटाची जळजळीत टीका

Uddhav Thackeray : ‘भाजप पक्ष नाही, ‘व्यापार केंद्र’; ठाकरे गटाची जळजळीत टीका

Uddhav Thackeray : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीनंतर (INDIA Alliance) भाजपने एनडीए आघाडीचा (Uddhav Thackeray) विस्तार करण्याची योजना आखली आहे. दोघांतील टीकाही जोरदारपणे होत आहे. आताही दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तेलंगाणातील जाहीर सभेतून इंडिया आघाडीतील घराणेशाहीवर तुफान टीका केली. याच टीकेला ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मोदींनी राजकीय घराण्यांना प्रायव्हेट कंपनी म्हटले. पण, यातील बऱ्याचशा प्रायव्हेट कंपन्या भाजपनेच चालवायला घेतल्या आहेत. ज्याला कुटुंब आहे त्याला भावना आहेत. भावना म्हणजे परिवार आहे. परिवार नसलेले लोक भावनाशून्य असतात. हिंदू संस्कृती व मोदींच्या नव्या सनातन धर्मात कुटुंब, परिवार, एकत्र कुटुंब पद्धती यास महत्व आहे. पण मोदींचा धर्म वेगळा आहे.

Nanded Hospital Deaths : चौकशी होणारच! तिघांची समिती आज नांदेडात

भाजप (BJP) आज पब्लिक कंपनी म्हणजे लोकांचा सहभाग असलेला पक्ष नाही. भाजप आज भागधारक, भांडवलदार, व्यापारी, गुंतवणूकदार लोकांचा प्रायव्हेट पक्ष बनला आहे. काँग्रेस पक्षाने सार्वजनिक उपक्रमांचा रचलेला पाया श्री मोदी प्रा. लिमिटेड कंपनीने मोडून खाल्ला. राहुल गांधी सांगतात त्या प्रमाणे ही कंपनी हम दो हमारे दो पुरतीच मर्यादित बनली. या प्रायव्हेट कंपनीस ना धोरण, ना विचारांचेत तोरण! अशा परिस्थितीत भाजप हा पक्ष नसन एक व्यापार केंद्रच बनले आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे.

तर मोदी शाहांचे नामोनिशाणही इतिहासात राहणार नाही

शरद पवारांचा हात धरून राजकारणात आलो असे सांगणारे मोदी त्यांच्या परिवारवादावर टीका करतात. पवारांच्या राजकीय परिवारातील प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार हे आज मोदींबरोबर आहेत. मोदी-शाह यांना कोणताही वैचारिक, सांस्कृतिक वारसा नाही. ते आले तसे जातील. त्यांचे नामोनिशाणही इतिहासात राहणार नाही.

Chhattisgarh Election : केजरीवालांनी गिरवला भाजपचा कित्ता; उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

सर्वाधिक राजकीय घराणी भाजपात

देशातील सर्वाधिक राजकीय घराणी आज भाजपात आहेत. ती काही भाजपाचा विचार पटतोय म्हणून नाही. ईडी, सीबीआचा धाक दाखवून ही घराणी भाजपने आपल्या तंबूत घेतली आहेत. भाजपाचे दात परिवारवादाबाबत जेथेच्या तेथे घशात घालता येतील अशी अनेक उदाहरणे देता येतील. अमित शहांचा परिवारवाद भारतीय क्रिकेटमध्ये कोणत्या निकषांवर विटीदांडू खेळत आहे, हा संशोधनाचा विषय आहे अशी टीका या लेखात करण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube