Nanded Hospital Deaths : चौकशी होणारच! तिघांची समिती आज नांदेडात

Nanded Hospital Deaths : चौकशी होणारच! तिघांची समिती आज नांदेडात

Nanded Hospital Deaths : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील 24 जणांच्या मृत्यूने (Nanded Hospital Deaths) राज्यभरात संतापाची लाट उसळली. आरोग्य व्यवस्थेचा हलगर्जीपणाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. या घटनेवर संताप व्यक्त करत विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवल्यानंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी आज चौकशी समिती नांदेडात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील डॉ. भारत चव्हाण, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. जोशी या तिघांची चौकशी समिती नांदेडात येणार आहे.

नांदेडमध्ये 24 तासात 24 मृत्यू! हाफकिनकडून औषध खरेदी का बंद केली, पर्यायी व्यवस्था कोणती उभारली?

राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. हाफकिनकडून औषधांची खरेदी बंद केली आहे. काही काळात हाफकिनकडून औषधांची खरेदी होणार होती, ती झालेली नाही. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषध पुरवठा होत नाही. औषध खरेदीसाठी पैशांची जितकी तरतूद आहे ती कमी पडते अशी प्रतिक्रिया अधिष्ठाता एस. आर. वाकोडे यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती.

हाफकिनकडून औषधांची खरेदी बंद का करण्यात आली?

2017 पूर्वी राज्यात सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग व औषधी द्रव्ये विभाग, एसआयसी, महापालिका अशा विविध यंत्रणांकडून स्वतंत्रपणे औषधे, उपकरणे, यंत्रसामुग्री अशा आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यात येत होती. पण खरेदीचे वेगवेगळे दर होते. यात सुसुत्रता आणण्यासाठी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठात एक याचिका दाखल झाली होती.

या याचिकेच्या पार्श्वभूमीवर खरेदी दरांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि एकत्रित खरेदी केल्यास कमीत कमी दर मिळावा म्हणून 26 जुलै 2017 तत्कालिन फडणवीस सरकारने हाफकीन महामंडळाच्या अंतर्गत खरेदी कक्ष स्थापन केला. यामार्फत राज्यातील औषधे आणि उपकरणांची सर्व विभागांची खरेदी करण्याची जबाबदारी देण्यात आली.

Nanded Civil Hospital Death: अधिकाऱ्याच्या अट्टहासने घेतले चिमुरड्यांचे बळी?

सीएम शिंदेंनीही दिली प्रतिक्रिया

दरम्यान, या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. या घटनेची माहिती घेतली जाईल. तसेच जे काही उपाययोजना करण्याची गरज आहे त्या केल्या जातील असे शिंदे म्हणाले. या प्रकारानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. आता तिघा जणांची समिती रुग्णालयात येऊन चौकशी करणार आहे. या चौकशीतून काय बाहेर येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube