Bachchu Kadu : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी ही धमकी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आळी आहे. हा धमकीचा संदेश त्याच्या मोबाईलवर आला आहे. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता प्रहारचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नरेंद्र मोदींवर टीका करताना विचारपूर्वक बोला, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना निर्देश
आता निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे मुद्दे संपले की वेगवेगळ्या रंगांचे झेंडे बाहेर येतात. मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी विशिष्ट धर्माला लक्ष्य केलं जातंय, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.
बच्चू कडू यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केल. नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना बच्चू कडू यांनी नामोल्लेख टाळत राणा दाम्पत्यावर टीका केली. आता निवडणुका जवळ आल्या आहेत. आता यांना एका धर्माला लक्ष्य करावेच लागणार आहे. कुठं डाळ शिजली नाही, तर वेगवेगळ्या रंगांचे झेंडे बाहेर निघतील, असे कडू म्हणाले.
Rohit Sharma : देशांतर्गत क्रिकेट प्रत्येकाला खेळावं लागेल, रोहितकडून इशान-श्रेयसची कानउघडणी
पुढं बोलतांना कडू म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. नवनीत राणांना धमक्या देणाऱ्यांना पाकिस्तानातून अफगाणिस्तानातून खेचूण आणलं पाहिजे. नवनीत राणा यांना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून धमक्या मइळत असतील तर मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह आहे. मोदींच्या सरकारमधील खासदाराला जर धमकी येत असेल तर मग कायदा कुठं राहिला? निवडणुक आहे म्हणून एका धर्माला टार्गेट केलं जात, असंही कडू म्हणाले.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जागावाटप आणि उमेदवारीच्या चर्चा सुरू झाल्या. जागावाटपाबाबत महायुतीच्या बैठकाही होत आहेत. यावरही कडू यांनी भाष्य केले. भाजप सर्व जागा कमळ या चिन्हावरच लढणार असल्याचा दावा कडू यांनी केला. ते म्हणाले की, भाजप महाराष्ट्रात सर्व जागांवर निवडणूक लढवू शकते. एकनाथ शिंदे गट आणि अजितदादा गटाचे उमेदवार निवडणूकीला उभे असतील. पण चिन्ह कमळ राहील, असं बच्चू कडू म्हणाले..