Download App

कोल्ड ड्रिंकमधून विष देऊन बालमित्रालाच संपविले; पोलिसांनी सांगितलेले कारणही धक्कादायक

Nagpur city : वेदांत खंडाडे मृतकाचे नाव आहे. मिथिलेश चकोले असे आरोपीचे नाव आहे. वेदांत आणि मिथिलेश हे दोघेही चांगले मित्र होते.

  • Written By: Last Updated:

Nagpur city Child friend killed friend by giving him poison in cold drink -नागपूर: मैत्री म्हटले की एकमेंकावर जीवापाड प्रेम असते. बालपणाच्या मैत्रीबाबत तर सांगायलाच नको. पण मैत्रीत घातही होतो. नागपूर (Nagpur) शहरातील हुडकेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीत अशीच घटना घडलीय. एका 19 वर्षीय मित्राने आपल्याच अल्पवयीन मित्राची कोल्ड ड्रिंकमध्ये विष देऊन हत्या केलीय. यातील आरोपीला अटक करण्यात आलीय. हत्याचे कारणही समोर आले आहे. मृत मित्र श्रीमंत घरचा असल्याने तो श्रीमंती दाखवत होता. याचा हेवा वाटल्याने ही हत्या केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

रणजित कासलेंना आणखी एक दणका, एसपी नवनीत कावतांची महत्वाची माहिती

वेदांत खंदाडे मृतकाचे नाव आहे. मिथिलेश चकोले असे आरोपीचे नाव आहे. वेदांत आणि मिथिलेश हे दोघेही मित्र होते. वेदांतच्या घराची परिस्थिती चांगली होती. त्याच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी वडिलोपार्जित शेती विकून ते या परिसरात राहायला आले. तेव्हा वेदांत आणि मिथिलेश मैत्री झाली. मिथिलेश हा साधारण परिवारातील आहे. दोघेही चांगले मित्र असल्याने 8 एप्रिल रोजी दोघेही फिरायला गेले. एका पानटपरीवर दोघांनीकोल्ड ड्रिंक घेतली. मिथिलेशने बाटलीमध्ये विष टाकले. त्याने केवळ कोल्ड ड्रिंक पिण्याचे नाटक केले. परंतु वेदांत हा कोल्ड ड्रिंक सेवन केले. त्यामुळे काही वेळातच त्याची ताब्यात बिघडली. त्यामुळे त्याला नातेवाइकांनी रुग्णालयात दाखल केले.

मोदीजी, संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लीम किंवा महिला कधी करणार? हर्षवर्धन सपकाळांचा प्रश्न 

मात्र, चार दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. पोलीस तक्रार होताच प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला असता त्याचा मृत्यू विष पिल्याने झाल्याचे समोर आले. पोलिसांनी घरच्यांची विचारपूस केली आणि माहिती घेऊन त्याच्या मित्राची चौकशी केली असता सगळा प्रकार समोर आला. या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, आता आरोपी मित्राला अटक करत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.


घराच्या परिसरात टाकली चिठ्ठी

खंडाडे यांच्या घराच्या परिसरात एक चिठ्ठी मिळून आले. त्यात अँटी डोप हवा असेल, तर पैसे द्यावे लागतील, असे लिहिण्यात आले होते. हे केवळ दिशाभूल करण्यासाठी करण्यात आले आहे. हा ठरवून केलेली हत्या आहे. हत्येचे कारणही समोर आले आहे. श्रीमंतीचा हेवा वाटत असल्याने हा खून करण्यात आल्याची माहिती नागपूरच्या डीसीपी रश्मिता राव यांनी दिली.

follow us