Download App

आधी आपला पक्ष एकसंघ ठेवा, मग तीन पक्षांची मूठ बांधावी; फडणवीसांचा ‘मविआ’वर घणाघात

Devendra Fadnavis On MVA : महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पहिले आपापले पक्ष एकसंघ ठेवावेत, त्यानंतर तीन पक्षांची मूठ बांधावी अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये आले असता त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला.(nagpur Devendra Fadnavis criticize on Mahavikas Aghadi shivsena thackeray group congress NCP)

‘आता मंत्रिमंडळ विस्ताराचाही काहीच फायदा नाही’; बच्चू कडूंनी सांगितलं तोट्याचं गणित

यावेळी पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारले की, नागपूरमध्ये विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा सपाटा सुरु आहे, महापालिका निवडणुकांचे संकेत आहेत का? असा सवाला केला. त्यावेळी फडणवीसांनी सांगितले की, महापालिका निवडणूक असो किंवा नसो, आमचे बाराही महिने काम सुरुच असते. त्यामुळे निवडणुकांचा आणि कामाचा काही संबंध नाही.

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद, पोलिसांची मोठी कारवाई

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्या माहितीनुसार या प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात होती. त्यानंतर सगळ्या केसेस ट्रान्सफर झाल्या होत्या, प्रायव्हेट पिटिशनल सुप्रीम कोर्टात गेले होते की, याची सुनावणी पूर्वी झाली असल्यामुळे उर्वरित निकालाची जी स्टेज आहे, याची पुन्हा सुरूवात केली तर अजून सात आठ वर्ष याचा निकाल येणार नाही, म्हणून पून्हा सुप्रीम कोर्टाने पुन्हा हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी नागपूर कोर्टात दिले आहे, त्यामुळे लवकर निकाल होईल.

लव जिहादच्या कायद्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात या कायद्याची मागणी आहे. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात आपली ओळख लपवून लग्न करायचे, धर्मांतरण करायचे अशा प्रकारच्या केसेस मोठ्या प्रमाणात बाहेर देखील आल्या आहेत.

म्हणून त्या संदर्भात सर्वच ठिकाणाहून कायदा केला पाहिजे अशा प्रकारची मागणी होत आहे. मी स्वतः सभागृहात मागच्या वेळेस घोषित केलं होतं की, वेगवेगळ्या राज्याच्या कायद्याचा आम्ही अभ्यास करत आहोत, त्यानंतर महाराष्ट्रात आम्ही निर्णय करु, असेही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Tags

follow us