दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद, पोलिसांची मोठी कारवाई

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद, पोलिसांची मोठी कारवाई

Ahmedangar Crime : श्रीरामपूर-वाकडी रोडवरील रेल्वे बोगद्या जवळ दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत आरोपींची टोळी स्थानिक गुन्हे शाखाकडुन जेरबंद करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी संबंधित सात आरोपींच्या टोळीकडून 5 लाख 61 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली होती की, श्रीरामपूर ते वाकडी रोडवरील रेल्वे बोगद्या जवळ काही तरुण दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जमा झाले आहे. यानंतर आहेर यांनी पोलीस पथकास पाठवून कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.

पोलीस पथकाने तात्काळ रेल्वे बोगद्या येथे धाव घेतली. यावेळी दिघी गावाकडे जाणारे रेल्वे बोगद्याजवळ अंधारात मोटारसायकल लावून काही तरुण मोटारसायकलवर व काही तरुण त्यांच्या जवळ आडोशाला बसले होते. त्यांच्या हालचालीवरुन हे दरोड्याच्या तयारीत असल्याची खात्री पटल्यावर पोलीस पथकाने छापा टाकून तरुणांना ताब्यात घेतले.

D2M : इंटरनेटशिवाय मोबाईलवर दिसणार TV; मोदी सरकारने बनवली खास योजना

ताब्यात घेण्यात आलेल्या मध्ये योगेश सिताराम पाटेकर (वय 25, वडाळा महादेव, श्रीरामपूर), अक्षय हिराचंद त्रिभुवन (वय 21, श्रीरामपूर), बबलु उर्फ दानिश शौकत शेख )वय 24, श्रीरामपूर), सुरेंद्र अशोक पवार (वय 20, रा. निमगांव, राहाता) 5) साहिल महेश साळुंके (वय 18, छत्रपती संभाजीनगर) शुभम वसंत वैद्य (वय 22, छत्रपती संभाजीनगर) व सागर संतोष केदारे (वय 22, छत्रपती संभाजीनगर) अशी त्यांची नावे आहेत.

गोऱ्हेंची खुर्ची वर्षभरासाठी सेफ! अधिवेशनात शेवटच्या दिवशी भाजपचा मास्टरस्ट्रोक; ठाकरे गट बुचकळ्यात

पोलीसांनी त्यांच्याकडील 10 ग्रॅम वजनाचे मिनीगंठण, 5 ग्रॅम वजनाची अर्धवट तुटलेली चैन, एअरगन, तलवार, विविध प्रकारचे 6 मोबाईल फोन, चार मोटार सायकल असा एकूण 5 लाख 61 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. संशयीतांना आदिक विचारपूस केली असता दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र जमल्याची कबुली त्यांनी दिली. आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube