‘आता मंत्रिमंडळ विस्ताराचाही काहीच फायदा नाही’; बच्चू कडूंनी सांगितलं तोट्याचं गणित

Bacchu Kadu And Eknath Shinde

Bacchu Kadu on Cabinet Expansion : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह सरकारमध्ये दाखल झाले. त्यांना मंत्रीपदेही मिळाली. मात्र मागील एक वर्षापासून मंत्रीपदाकडे डोळे लावून बसलेल्या शिंदे गटातील आमदारांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली. यामुळे आमदार प्रचंड नाराज झाले. त्यांनी नाराजी बोलूनही दाखवली. यामध्ये आमदार बच्चू कडू आघाडीवर होते. त्यांनी अनेकवेळी नाराजी बोलून दाखवली. आताही त्यांनी असेच टोचणारे वक्तव्य केले आहे.

कडू यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारावर प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारादिवशी मी अमेरिकत किंवा परदेशात असेल असं मागे सांगितलं आहे. आता जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या आचारसंहिता लागू शकते. नंतर लोकसभा आणि मग विधानसभेची आचारसंहिता लागते. त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळ विस्तार करून काहीच फायदा होणार नाही.

शिवसेनेच्या संपत्तीवरुनही मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना घेरलं! म्हणाले, फक्त पैशांबद्दलच..,

शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह आमच्याकडे असताना त्यांनी बँक खात्यातील 50 कोटी रुपये देण्याबाबत मला पत्र पाठवले. लगेच ते पैसे देऊन टाकले. कारण, मला त्यांच्या संपत्तीत रस नाही. आम्हाला 50 खोके आणि गद्दार म्हणून हिणवले. पण, हेच महागद्दार आहेत, अशी घणाघाती टीका काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. यावरही कडू यांनी भाष्य केले.

गद्दार म्हणण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही

उद्धव ठाकरे यांना गद्दार म्हणण्याचा किंवा खोके म्हणण्याचा अधिकार नाही. कारण, फार कष्टातून आणि मेहनतीतून ते पक्ष चालवत आहेत असं नाही. बिगर खोक्यांचा त्यांचा पक्ष चालल नसेल. मागील तीस वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता त्यांच्या हातात होती. या काळात महापालिकेत काहीच केलं नाही हे शक्य नाही. आदित्य ठाकरे हे नेहमी खोके सरकार बोलत असतात. पहिले स्वतःपासून तपासून घेऊन आरोप केले पाहिजेत, अशी टीका कडू यांनी केली.

‘आदित्य ठाकरेंच्या डोळ्यांना पट्टी, उत्तर देऊन फायदा काय?’ फडणवीसांचा खोचक टोला

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube