Download App

सदावर्तेंचं टेन्शन वाढणार; एसटी कर्मचारी बँकेतील अनियमिततेबद्दल होणार कारवाई : वळसे पाटील

Dilip Walse Patil : राज्य परिवहन महामंडळातील कामगारांच्या हितासाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँक (maharashtra state transport cooperative bank)स्थापन केलेली आहे. या बँकेत निवडणुकीनंतर नवीन संचालक मंडळ आले आहे. या संचालक मंडळाने घेतलेले निर्णय तसेच त्यांच्या काळातील कामकाजाची आर्थिक तपासणी (Financial check)करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक मुंबई -1 यांची नियुक्ती केली आहे. या प्रकरणी दोन महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील Dilip Walse Patil यांनी सभागृहात सांगितले.

शासकीय-निमशासकीय, शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी बेमुदत संपावर!

त्याचबरोबर अहवाल रिझर्व्ह बँकेला सादर करण्यात येईल. तसेच बँकेतील अनियमिततेबाबत योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. त्यामुळे आता अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte)यांचं टेन्शन वाढणार आहे.

स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकारांना आळा बसणार; सरकारने उचललं मोठं पाऊल

याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर सहकार मंत्री वळसे पाटील म्हणाले की, बँकेची अशा प्रकारची चर्चा झाल्यामुळे भितीपोटी बँकेतील सभासदांनी 180 कोटी रुपयांच्या ठेवी काढल्या. बँकेत 23 नोव्हेंबर 2023 पर्यंत 1844 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.

बँकेला कुठल्याही प्रकारे क्षती पोहचणार नाही, याची काळजी शासन घेईल असेही यावेळी वळसे पाटील यांनी सांगितले. बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासन पूर्णपणे बँकेच्या पाठिशी असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाटील पुढे म्हणाले, बँकेच्या संचालक मंडळाला कर्जाचे व्याजाचा दर ठरविण्याचा अधिकार आहे. त्यानुसार संचालक मंडळाने कर्जाच्या व्याजाचा दर 9 व 14 टक्के वरुन 7 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. बँकेच्या नवीन संचालक मंडळाने एकूण 14 ठराव मंजूर केले आहेत. रिझर्व्ह बँकेने या बँकेला ठराव दुरुस्त करायला सांगितले असून बँकेने सदर ठराव रद्द केले आहेत. या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, यामिनी जाधव, सर्वश्री जयंत पाटील, हरिभाऊ बागडे, अजय चौधरी, बाळासाहेब पाटील यांनी सहभाग घेतला.

बँकेतील 14 संचालक सदावर्तेंविरोधात :
एसटी कर्मचारी जनसंघाचे उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर यापूर्वीच गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, एसटी कर्मचारी सहकारी बँकेत गुणरत्न सदावर्ते यांचा आम्ही मार्गदर्शक म्हणून स्वीकार केला, पण ते आता सर्वांचे मालक व्हायला निघाले आहेत. त्यामुळे आमच्यासह एसटी जनसंघाने विरोध केला. बँकेच्या 19 संचालकांपैकी 14 जण सदावर्तेंच्या विरोधात आहेत. त्यांना सदावर्तेंकडून धमक्या अन् आलिशान गाड्यांची आमिषं दाखवल्याचा गंभीर आरोप अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर केला आहे.

त्याचबरोबर सदावर्तेंनी पैसे घेऊन आणि बेकायदेशीररित्या नोकर भरती केली. त्यांचे मेहुणे सौरभ पाटील यांना बँकिंग क्षेत्रामधील कोणताही अनुभव नसताना त्यांची उच्च अधिकारीपदी नियुक्ती करुन एक नवा वाद निर्माण केला होता. त्यांनी 38 कर्मचाऱ्यांची गैरमार्गाने निवड केल्याचाही आरोप एसटी कर्मचारी जनसंघाचे उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केला आहे.

Tags

follow us