शासकीय-निमशासकीय, शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी बेमुदत संपावर!
Ahmednagar News : जुनी पेन्शन (Old Pension) सर्वांना मंजूर करा, या मागणीसाठी अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील सरकारी व निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप (employees strike) पुकारला आहे. या संपाबाबत कर्मचाऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. जुनी पेन्शन सर्वांना लागू करण्याची मागणी यावेळी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
खासदार अफजल अन्सारींना SC चा दिलासा, कृष्णानंद राय हत्या प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती
या बेमुदत संपामध्ये सर्व राजपत्रित अधिकारी महासंघही एक दिवसीय रजा आंदोलन करत संपात सहभागी झाले आहेत. मार्च 2023 मध्ये सरकारी कर्मचारी, शिक्षकांनी प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप आंदोलन छेडले होते. त्यावेळी संपात मध्यस्थी करुन संघटना प्रतिनिधींशी चर्चा केली गेली या चर्चेत प्राधान्यक्रमावर असलेली जुनी पेन्शन सर्वांना मंजूर करा, या मागणीची लेखी हमी देऊन कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात आला होता. तसेच इतर 17 मागण्यांबाबत सत्वर निर्णय घेतले जाणार असल्याचं आश्वासनही देण्यात आलं होतं. त्यामुळे शासन स्तरावरील कार्यवाही पूर्ण होण्यास वेळ मिळावा, या उद्देशाने विनंती नुसार कर्मचाऱ्यांनी संप आदोलन स्थगित केले होते.
Ahmednagar News: नगर जिल्ह्यातील जलजीवन योजनेत घोटाळा; लंकेकडून थेट कारवाईची मागणी
राज्याच्या प्रमुखांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होईल, अशी अपेक्षा होती. परंतु गत सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरही कोणत्याही मागणी संदर्भात अंतिम ठोस निर्णय अद्याप होऊ शकला नाही. त्यामुळे सर्वदूर महाराष्ट्रातील कर्मचारी शिक्षक कमालीचे संतप्त झालेले आहेत. हा रोष व्यक्त करण्यासाठी राज्यातील १७ लाख कर्मचारी-शिक्षकांनी १४ डिसेंबर २०२३ पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार पक्का केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या हिताचा ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कर्मचारी वर्गाकडून करण्यात आली आहे.
मोदी-शहांनी मुख्यमंत्री केलेले भजनलाल शर्मा यांचे हे किस्से तुम्ही कधीच ऐकले नसतील….
रास्त प्रलंबित मागण्यांबाबत ठोस निर्णय तत्काळ होऊ शकले नाहीत तर निर्णयक संघर्ष अटळ असल्याची भावना आंदोलक कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या आशयाचे पत्र कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. पारनेर तहसील कार्यालयात सुरू असणाऱ्या या आंदोलनात सर्व शासकीय कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी शासकीय अधिकारी व कर्मचारी शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते.