Old Pension : CM शिंदेंचं आश्वासन निष्फळ! आजपासून 17 लाख कर्मचारी संपावर

Old Pension : CM शिंदेंचं आश्वासन निष्फळ! आजपासून 17 लाख कर्मचारी संपावर

Old Pension Scheme : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session) नागपुरात सुरू आहे. तर दुसरीकडे राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेची मागणी (Old Pension Scheme) करत सरकारची कोंडी केली आहे. आता तर आणखी एक पाऊल पुढे टाकले असून या कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप सुरू केला आहे. या संपात राज्यातील लाखो कर्मचारी सहभागी झाल्याने कामकाज कोलमडले आहे. आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारबरोबर चर्चा निष्फळ ठरल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आज अधिवेशनाचा नववा दिवस आहे. त्यामुळे आज या मुद्द्यावर सभागहात वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

विधिमंडळाच्या पुढील वर्षी होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना संपकरी संघटनांच्या नेत्यांना दिले होते. मात्र, या आश्वासनावर संपकऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे आजपासून संप सुरू करण्यात आला आहे.

Maharashtra Politics : फडणवीसांनी अजितदादांना पत्र का दिलं? पृथ्वीराजबाबांनी सांगितलं धक्कादायक कारण

संपामुळे सर्वसामान्य नागरिकांचेच हाल होणार आहेत. याची जाणीव सरकारला आहे तशीच कर्मचाऱ्यांनाही आहे. मात्र मागणी मान्य करून घेण्यासाठी त्यांनी हा मार्ग निवडला आहे. त्याचे परिणामही दिसण्यास सुरुवात झाली आहे. आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचाही यात सहभाग आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. आता सरकार ही कोंडी फोडण्यासाठी अधिवेशनात काही घोषणा करील का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube