Nalasopara Crime : धक्कादायक, नालासोपाऱ्यात आईकडून 15 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या
Nalasopara Crime : नालासोपारा पूर्वेकडील विद्या विकास मंडळ चाळ, टांडा पाडा, संतोषभुवन परिसरात शुक्रवारी सायंकाळी एक अत्यंत धक्कादायक
Nalasopara Crime : नालासोपारा पूर्वेकडील विद्या विकास मंडळ चाळ, टांडा पाडा, संतोषभुवन परिसरात शुक्रवारी सायंकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात कारणातून एका आईने आपल्या अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे व संतापाचे वातावरण परसले आहे.
सध्या या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी (Nalasopara Crime) ही पाच भावंडांमध्ये सर्वात मोठी असून तिचे वय सुमारे 15 वर्ष होते. ही घटना सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. सुरुवातीला गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपी आईने सिलबट्ट्याने मुलीच्या डोक्यावर प्रहार करून तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे.
T20 World Cup 2026 विश्वचषकातून पाकिस्तानने माघार घेतली तर ‘या’ संघाला मिळणार संधी
सध्या हत्या करण्यामागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून कुटुंबातील इतर सदस्यांची चौकशी सुरू असून प्रकरणाचा सखोल तपास केला जात असल्याची माहिती नालासोपारा पोलिसांकडून देण्यात आली आहे.
अजितदादांच्या आमदाराची एकच पोस्ट, दोन्ही राष्ट्रवादीमध्ये भडका उडणार?
