पाकिस्तानचा झेंडा वाचवला, नालासोपारा पोलिसांनी तिघांच्या आवळल्या मुसक्या

पाकिस्तानचा झेंडा वाचवला, नालासोपारा पोलिसांनी तिघांच्या आवळल्या मुसक्या

Police arrested three who threatening citizens of Nalasopara protesting against Pakistani : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढलाय. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध (India Pakistan War) काही कठोर पावले उचलली. यामध्ये सिंधू पाणी करार स्थगित करणे समाविष्ट आहे. भारताच्या या पावलानंतर पाकिस्ताननेही (Pakistan) काही घोषणा केल्या आहेत. दरम्यान भारतीय नागरिक पाकिस्तानविरोधात निषेध व्यक्त करीत आहे.

नालासोपारा येथे पहलगाम घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी नालासोपारा (Nalasopara) येथील नागरिक पहलगाम काश्मीर घटनेच्या निषेधात पाकिस्तानचा झेंडा आणि अतिरेक्यांचा निषेध करत होते. यावेळी तिघांनी नालासोपारा येथील नागरिकांना धमकी देऊन पाकिस्तानचा झेंडा वाचवला. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. तर नालासोपारा पोलिसांनी पाकिस्तानचा झेंडा वाचविणाऱ्या अन् नालासोपारा येथील नागरिकांना धमकवणाऱ्या उस्मान गणी, तौशिद आझाद शेख आणि अदनान अफसर शेख यांना अटक केली आहे. आरोपी सध्या पोलीस कस्टडीत असल्याची माहिती X अकाउंटवर पोस्ट करत भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी दिली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत अन् पाकिस्तानमध्ये तणाव; पंतप्रधान शहबाज शरीफांना बंधू नवाझ शरीफांचा महत्वाचा सल्ला

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हत्याकांडाविरोधात देशभरात संताप व्यक्त करण्यात आला. या हल्ल्याच्या विरोधात संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमध्ये निदर्शने होत आहेत. अशा लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे. या दहशतवाद्यांना लपवणाऱ्या आणि त्यांना पैसे आणि शस्त्रे देणाऱ्या देशांवरही कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी संपूर्ण देशातून केली जात आहे.

दहशतवाद्यांकडे धर्म विचारण्यासाठी वेळ होता का? पहलगाम हल्ल्याबाबत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं विधान

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 22 एप्रिल रोजी 26 जणांची हत्या केली. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या धक्कादायक घटनेत महाराष्ट्रातल्या सहा पर्यटकांचा मृत्यू झालाय. हिंदु आहे का, असं विचारून मारल्याचा आरोप पर्यटक करत आहेत. या प्रकरणात दोषींवर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube