Download App

Lok Sabha Election: आघाडीचा धर्म पाळला जात नाही; भिवंडी, सांगलीवरून पटोलेंनी कुणाला सुनावले?

  • Written By: Last Updated:

Nana Patole on Sangli and Bhiwandi Lok sabha Seat: लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election n) राज्यातील महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. सांगली आणि भिवंडी या दोन जागांवरून महाविकास आघाडीत वाद निर्माण झाला आहे. सांगलीच्या जागेवर ( Sangli Lok sabha Seat) उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार जाहीर केला आहे. तर भिवंडीचा जागा शरद पवार गटाला हवी आहे. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी थेट उद्धव ठाकरे व शरद पवारांना सुनाविण्याची भाषाच वापरली आहे. त्यावरून आता वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अखेर ठरलं! ज्योती मेटे लोकसभा लढवणार, शासकीय नोकरीचा दिला राजीनामा

नागपूर येथून काँग्रेसने विकास ठाकरे यांना मैदानात उतरविले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पेटोले यांच्या उपस्थित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, या दोन्ही जागांबाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी एक बैठक झाली आहे. त्यात दोन्ही जागा काँग्रेसच्या परंपरागत आहे. या जागांवर ते दावा करू शकत नाही. या जागांवर आम्हाला चांगले उमेदवारही आहेत.

मोठी बातमी : अजितदादांना नडणं भोवलं! शिवतारेंना शिंदेकडून निरोपाचा नारळ; आज धडकणार नोटीस


उद्धव ठाकरेंनी हे बरोबर केले नाही

सर्व जागा वाटप अंतिम झालेले आहे. केवळ या दोन जागांबाबत निर्णय झालेला नाही. आघाडीचा धर्म हा सगळ्यांनी पाळायचा असतो. आघाडीचा धर्म पाळता नाहीत. ते दोन्ही मोठे नेते आहेत. ते मोठ्या पदावर राहिलेले आहेत. सांगली आणि भिवंडीचा वाद हा दिल्लीचा नाही. हा वाद राज्यातील आहे. सांगलीच्या जागेबाबत वाद आहे. सांगलीत उद्धव ठाकरे यांनी उमेदवार जाहीर करून बरोबर केलेले नाही. सांगलीच्या जागाबाबत आम्ही उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव दिला आहे ते मान्य करतील, असे पटोले म्हणाले.

आंबेडकरांबाबत काँग्रेसचा ग्रीन सिग्नल, आता चेंडू पवार, ठाकरेंकडे
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला एक प्रस्ताव दिला आहे. काँग्रेसकडून एक पाऊल पुढे टाकत आहे. काँग्रेसची त्यांच्याबरोबर जाण्याची तयारी आहे. आता उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी त्यावर आता निर्णय घ्यावा, असेही पटोले म्हणाले.

follow us