महाविकास आघाडीचं जागावाटप कधी फायनल होणार? नाना पटोलेंनी सांगितलं
Nana Patole : आगामी लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election) कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षांकडून हालचालींना वेग आला आहे. एकीकडे महायुतीमध्ये जागावाटपावरुन चर्चा सुरु असून दुसरीकडे महाविकास आघाडीतही जागावाटपावर मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. अशातच आता महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी महाविकास आघाडीचं जागावाटप कधी फायनल होणार याबाबत थेट सांगून टाकलं आहे.
चार महिन्यांचा मुलगा थेट कोट्यधीश! Narayan Murthy यांच्याकडून नातवाला 240 कोटींचे शेअर्स गिफ्ट
नाना पटोले म्हणाले, सध्या माध्यमांमध्ये येत असलेला जागांचा फॉर्मूला फायनल नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चार ते पाच जागांवर चर्चा सुरु आहे. राज्यात पाच टप्प्यांमध्ये निवडणूका पार पडणार आहे. त्यामुळे जागावाटपावर ही चर्चा सुरुच राहणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये फक्त चार ते पाच जागांवर चर्चा आहे, ही चर्चा झाल्यानंतर एक ते दोन दिवसांतच जागावाटप फायनल होणार असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.
आम्ही ठरवलं, गरज पडली तर रोजच बारामतीत येऊन बसू…; चंद्रकांत पाटलांचा मविआला इशारा
तसेच सांगलीच्या जागेवर महाविकास आघाडीत चर्चा सुरु आहे. सांगलीमध्ये काँग्रेसचे विशाल पाटील हे काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत.
सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यावर चर्चा सुरु आहे, त्यामुळे आम्ही अद्याप जाहीर केलं नाही. तर जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघात उमेदवाराची अडचण आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे त्या जागेवरुन लढणार होते, मात्र त्यांची तब्येत खराब असल्याची माहिती आहे. हा इशू आहे तो राष्ट्रवादीचा इशू असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
महाविकास आघाडीत जागावाटपावर जशा अडचणी सुरु आहेत. अगदी तशाच अडचणी महायुतीतही सुरु आहेत. महाविकास आघाडीत चार, पाच जागांवर आमची चर्चा सुरु आहे, पुढील एक दिवसांत हा तिढा सुटणार आहे. चार पाच जागांचा प्रश्न आहे त्यावर चर्चा सुरु आहे चर्चा संपल्यानंतर महाविकास आघाडीकडून जागा जाहीर केल्या जाणार आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवरच निवडणूका घ्यायला हव्यात आहेत ही लोकांची मागणी आहे ती मान्य केली पाहिजे, अशीही मागणी नाना पटोले यांनी केली आहे.