Nana Patole : ‘जरांगेंचे आरोप गंभीर, फडणवीसांचीच SIT चौकशी करा’; नाना पटोलेंची मागणी
Nana Patole : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या आरोपांचे आणि चिघळलेल्या आंदोलनाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटत आहे. जरांगे पाटील यांच्या संपूर्ण आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिले आहेत. या प्रकरणावर आता विरोधकही आक्रमक झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देवेंद्र फडणवीस यांचीच एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे फडणवीसांचीही एसआयटीद्वारे चौकशी व्हायला हवी, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली.
Manoj Jarange : ‘मी कोणत्याच पक्षाचा नाही, मराठा समाजाला.. मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितलं
नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांचीच एसआयटी चौकशी केली पाहिजे. तसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने मनोज जरांगे यांच्याबरोबर चर्चा करत होते. त्यांच्यात काय चर्चा होत होती. या चर्चेचा तपशील आता समोर आला पाहिजे, असेही पटोले म्हणाले.
मनोज जरांगे काय म्हणाले होते ?
मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे रविवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. मला सलाईनमधून विष देऊन मारण्याचा कट फडणवीसांनी रचला. त्यामुळेच मी सलाईन घेणं बंद केलं. देवेंद्र फडणवीस तुम्हाला मला मारायचंच असेल तर मीच सागर बंगल्यावर येतो मला मारून दाखवा, असे जरांगे पाटील म्हणाले होते.
Devendra Fadnavis : मनसे-भाजप युती होणार का? फडणवीस म्हणाले, आमची राज ठाकरेंबरोबर
मनोज जरांगेंचा बोलवता धनी शोधणार : फडणवीस
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी, त्यांनी केलेल्या आरोपांशी आणि त्यांनी वापरलेल्या भाषेशी आपल्याला काही देणं-घेणं नाही. पण यामागचा बोलवता धनी शोधणार आहे. लाठीचार्जची घटना झाल्यानंतर कोणाच्या कारखान्यावर बैठका झाल्या, कोण त्यांना रात्री त्यांच्या घरी भेटायला गेले होते. त्यांना रात्री उठवून परत आंदोलनाला कोणी बसवले या सगळ्या गोष्टींचा शोध घेणार आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी दिला आहे.