Lok Sabha Election : जागावाटपाचा प्रस्ताव ‘वंचित’ने नाकारला; महाविकास आघाडीचा पुढील प्लॅन काय ?
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोग (Lok Sabha Election) आजच करणार आहे. तरी देखील महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा मिटलेला नाही. वंचित बहुजन आघाडीला आघाडीत सामील करून घ्यायचे आहे. परंतु, किती जागा द्यायच्या यावर अजूनही एकमत होऊ शकलेले नाही. काल आघाडीच्या नेत्यांनी अकोला व्यतिरिक्त ज्या दोन जागांचा प्रस्ताव दिला होता तो वंचित आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने एकमताने फेटाळल्याची माहिती आहे. अकोल्याची जागा सोडण्याची तयारी आम्ही दाखवली होती. परंतु, पराभूत होणाऱ्या ज्या दोन जागा दिल्या जात आहेत त्या आम्हाला नको, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी दिली.
वंचित आघाडीच्या या भूमिकेनंतर वंचित महाविकास आघाडीत सहभागी होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे वंचितशिवाय दुसरा प्लॅन बी मविआच्या नेत्यांनी तयार केला आहे का अशीही चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपावर पुढील निर्णय आता 17 मार्चनंतर होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रकाश आंबेडकरांच्या तोऱ्याला ठाकरेच वैतागले… माजी आमदाराला अकोल्यात तयारीच्या सूचना
आता वंचित बहुजन आघाडीशिवाय जर जागावाटप झालं तर शिवसेना ठाकरे गट 23 जागांवर ठाम राहिल. काँग्रेस 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा मिळण्याची शक्यता राहिल. वंचित बहुजन आघाडीने अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट न केल्याने हा दुसरा प्लॅन तयार ठेवण्यात आला आहे. या प्लॅनवर आघाडीचे नेते पुढे जाणार का याचे उत्तर 17 मार्चनंतरच मिळेल.
महाविकास आघाडीची शेवटची बैठक 6 मार्च रोजी झाली होती. त्यानंतर आघाडीच्या नेत्यांनी कोणताही संपर्क केलेला नाही.या पद्धतीची वागणूक वंचित आघाडीला दिली जात आहे. मविआला वंचित आघाडीची गरज आहे. वंचितचा मतदार पाहिजे आहे मग वंचितचा उमेदवार निवडणूक द्यायची तयारी त्यांनी दाखवली पाहिजे. परंतु, उमेदवार नाकारायचे आणि पडणाऱ्या जागा द्यायच्या हे आम्हाला मान्य नाही. इंडिया किंवा महाविकास आघाडीत जाण्यासाठी आम्ही नकार देत नाही. पण त्यांनी दिलेला प्रस्ताव आम्हाला मान्य नाही असे मोकळे म्हणाले.
‘वंचित’च्या तक्रारी आम्ही सोडवणार; चर्चा फिस्कटल्यानंतर शरद पवारांचा आंबेडकरांना शब्द