अखेर ठरलं! ज्योती मेटे लोकसभा लढवणार, शासकीय नोकरीचा दिला राजीनामा

अखेर ठरलं! ज्योती मेटे लोकसभा लढवणार, शासकीय नोकरीचा दिला राजीनामा

Jyoti Mete : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर दिवंगत नेते विनायक मेटे (Vinayak Mete)यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी कंबर कसली आहे. ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्योती मेटे यांनी आपल्या अप्पर सहनिबंधक पदाच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी स्व. विनायक मेटे यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतले. यावेळी मेटे यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ज्योती मेटे यांनी आपण बीडमधून लोकसभा (Beed Loksabha)निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे सांगितले आहे.

Sunny Leone: सनी लिओनीने आंतरराष्ट्रीय कलाकार मार्शमेलोसोबत केलं खास कोलॅब

बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलं आहे. बीड लोकसभा निवडणुकीत खासदार प्रितम मुंडे यांना डावलून भाजपने पंकजा यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं आता पंकजा मुंडे यांच्याविरोधात महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देणार अशी चर्चा होती. त्यातच आता ज्योती मेटे यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे.

Ahmednagar : महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यात वाळूतस्कराकडून तहसीलदारांना शिवीगाळ; कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन

ज्योती मेटे यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवार यांच्याशी तब्बल तास दीड तास चर्चादेखील झाली. मात्र त्यानंतर ज्योती मेटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर मेटे यांची नाराजी दूर झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या. पण आज मात्र ज्योती मेटे यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.

त्यामुळे आता ज्योती मेटे यांच्या निर्णयाकडं सर्वांचच लक्ष लागलं आहे. कारण मेटे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्या अपक्ष लढणार की कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार? हे अद्यापही जाहीर केलेलं नाही. त्यामुळं त्या काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube