ज्योती मेटेंना भाजप शांत करणार! पंकजा मुंडेसाठी फडणवीस सरसावले…
Jyoti Mete : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) अवघ्या काही दिवसांवर आल्यात. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे (Jyoti Mete) या लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांना महाविकास आघाडीसोबत आणण्यासाठी शरद पवार प्रयत्नशील आहेत. अलीकडेच ज्योती मेटेंनी पवारांची भेट घेतली. त्यानंतर आता त्यांनी भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली. त्यामुळं राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं.
BJP Candidate List : वरुण गांधींचा पत्ता कट, मनेका गांधींना ‘या’ मतदारसंघातून मिळाली उमेदवारी
फडणवीस गेल्या काही तासांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकांमध्ये व्यस्त होते. मात्र आता त्यांच्या सागर बंगल्यावर ज्योती मेटे दाखल झाल्यानं फडणवीस त्यांची भेटीसाठी तात्काळ निघाले. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ज्योती मेटे यांची बैठक पार पडली. जवळपास 25-30 मिनिटं त्यांच्यात झाली चर्चा झाल्याची माहिती आहे.
BJP Candidate List : अभिनेत्री कंगना रणौत हिची अखेर राजकारणात एंट्री, भाजपने दिली लोकसभेची उमेदवारी
ज्योती मेटे बीडमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्या शरद पवार गटात प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत होती. मंगळवारी पवार आणि मेटे यांची पुण्यात भेट झाली होती. ज्योती मेटेंना शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोलल्या जातं होतं. मात्र आता ज्योती मेटेंनी फडणवीस यांची भेट घेतल्यानं अनेकाच्या भुवया उंचावल्या आहेत.
पंकजा मुंडे यांना भाजपने बीडमधून लोकसभेच्या उमेदवार घोषित केल्यानंतर अजित पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. सोनवणे हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांनाही पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं ज्योती मेटेंनी फडणवीस यांची भेट घेतली जाण्याची शक्यता आहे, तर पंकजा मुडेंसाठी फडणवीस हे ज्योती मेटेंना माघार घ्यायला लावतील, ही शक्यताही नाकारता येत नाही.मात्र, या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? हे अद्याप कळू शकलं नही.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी ज्योती मेटे यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणार की, महाविकास आघाडीकडून उमदेवारी मिळणार? हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.