मराठा समाज आक्रमक! काळे झेंडे दाखवल्यानंतर पंकजा मुंडेंनी दिले पोलिसांना आदेश
Pankaja Munde : भाजपने बीड लोकसभा (Loksabha Election) मतदारसंघातून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर निवडणूक प्रचारासाठी पंकजा यांनी पायाला भिंगरी बांधून दौऱ्याला सुरूवात केली आहे. दरम्यान, काल पंकजा मुंडे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांना मराठा बांधवांनी काळे झेंडे दाखवत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी यावर भाष्य केलं.
मुंडे बहिण-भाऊ गोपीनाथ गडावर एकत्र, पंकजांच्या उमदेवारीवर धनंजय मुंडे काय म्हणाले?
बीडमध्ये पंकजा मुंडेंना काळे झेंडे दाखवल्यानं काही मराठा आंदोलकांवर बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले. याविषयी आज माध्यमांशी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ज्यांनी झेंडे दाखवले ती लहान मुंले होती, माझ्या मुलांपेक्षाही ती मुलं मुलं होती. त्यांना कुणीतरी झेंडे दाखवायला सांगितले असतील. त्यामुळं त्यांनी काळए झेंडे दाखवले. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावर कोणतेही गुन्हे नोंदवू नये. ही मुलं आज शिकत असतील, उद्या नोकरीसाठी प्रयत्न करतील. त्यांच्यावर केसेस दाखल असतील तर त्यांना पुढं अडचणी येऊ शकतात. मला कोणाचंही भवितव्य खराब करायचं. त्यामुळं झेंडे दाखवले म्हणून कोणत्याही मुलावर गुन्हा नोंदवू नये, असं पत्र मी पोलिसांनी दिल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं.
‘लेकरांसाठी गुन्हे अंगावर घ्या पण..,’; जरांगेंकडून मराठा बांधवांना आवाहन
लोकसभा निवडणुकीबाबत मराठा समाजाची भूमिका निश्चित करण्यासाठी मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीत बैठक घेतली. यावेळी त्यांनी एका लोकसभा मतदारसंघात शेकडो मराठा उमेदवार उभे केल्यास मतं फुटतील. त्यापेक्षा जिल्ह्यातून एकच अपक्ष उमदेवार द्या आणि त्याच्या मागे संपूर्ण ताकद उभी करा, कोणाला उमेदवारी द्यायची त्याचा निर्णय तुम्ही घ्या, ते मी सांगणार नाही, असं जरांगे पाटील यांनी सांगितलं. यावरही पंकजा मुंडेंनी प्रतिक्रया दिली.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, अत्यंत साधेपणातून आणि कोणतेही पाठबळ नसतांना त्यांनी उभं राहिलेलं आंदोलन आणि त्यातून जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहे. याआधीही मनोज जरांगे पाटील यांनी मी कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठीशी उभा राहणार नाही, असे सांगितले होते. ते त्यांनी आज पुन्हा सिद्ध केलं. शेवटी निवडणुकीत अपक्ष उमेदवार द्यायचा की नाही हा त्यांचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया मुंडेंनी दिली.