Download App

‘नवरा-बायकोच्यामध्ये बोलू नका’; नवनीत राणांनी बावनकुळेंना सुनावलं

Navneet Rana On Chandrashekhar Bawankule : नवरा-बायकोच्यामध्ये बोलू नये, या शब्दांत अमरावती लोकसभा (Amravati Loksabha) महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना (Chandrashekhar Bawankule) सुनावलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळेंनी रवी राणा यांच्या भाजप प्रवेशाबाबत विधान केलं होतं. राणा यांना बावनकुळेंचं हे विधान रुचलं नसल्याने त्यांनी सुनावलं आहे.

‘खडसेंना राष्ट्रवादीत घेतलं हीच मोठी चूक, शरद पवारांनीच मान्य केलं’, मोठ्या नेत्याचा दावा

नवनीत राणा म्हणाल्या, भाजपमध्ये मी माझ्या मर्जीने प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी भाजपमध्ये एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे. रवी राणा यांना स्वतंत्र पद्धतीने राजकारण काम करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे बावनकुळेंनी नवरा-बायकोच्यामध्ये बोलू नये, असं नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं आहे.

“तुम्ही मला मूर्ख समजू नका”, विजय शिवतारेंबद्दलचा प्रश्न अन् अजितदादा संतापलेच..

तसेच मी ज्या पक्षात कार्यकर्ता आहे त्या पक्षाचे नेते पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आहेत. हा निर्णय मी माझ्या स्वेच्छेने घेतला आहे. माझे पती रवी राणा त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेतील. नवरा-बायकोमध्ये बाहेरचं कोणी बोललं नाही तरच बरं.. असं मला वाटतं, असंही नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

समोर आली बिग बॉस OTT 3 च्या स्पर्धकांची यादी, जाणून घ्या कोण आहेत ते कलाकार

दरम्यान, अमरावती लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर होताच राणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर नवनीत राणा त्यांचे पती रवी राणा यांनाही युवा स्वाभिमानी पक्ष सोडून भाजपात येण्याचे आदेश देणार असल्याचं बावनकुळे म्हणाले होते.

नवनीत राणा अमरावतीच्या विद्यमान खासदार आहेत. त्या अपक्ष होत्या. आता निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत राणा यांनी शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव करत अपक्ष खासदार म्हणून विजय मिळवला होता.

follow us