Nitesh Karale : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) मतदानादरम्यान वर्ध्यातून मोठी बातमी समोर आली. राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रवक्ते नितेश कराळे (Nitesh Karale) मास्तरांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप नितेश कराळे यांनी केला. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला. दरम्यान, या मारहाणीनंतर कराळे मास्तरांनी पोलीस (Police) स्टेशनमध्ये धाव घेतली.
प्रणिती शिंदे भाजपची बी टीम, त्यांनी केसाने गळा कापला; अपक्षाला पाठिंबा दिल्यानं शरद कोळी संतापले
नितेश कराळे मास्तरांना बूथवर मारहाण#NiteshKarale #VidhansabhaElection #Wardha pic.twitter.com/wzIyFFePs4
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) November 20, 2024
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती नितेश कराळे यांना मारहाण करताना दिसत आहे. दरम्यान, नितीश कराळे यांनी आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, मी मतदान करून माझ्या गावावरून येत होतो. मधात उमरी गाव आहे. त्याठिकाणी मी थांबून आमच्या कार्यकर्त्यांना भेटलो. त्यांनाी सांगितलं की, आपले दोन कार्यकर्ते बूथवर आहेत. पोलिसांनी दोनच कार्यकर्ते बूथवर ठेवायला सांगितल्याचं कार्यकर्ते म्हणाले. तिथं भापज आमदार पंकज भोयर यांचाही बूथ होता. या बथूवर मात्र आठ जण बसले होते.
भाजप उमेदवार राम शिंदे यांच्यासाठी पैसे वाटप; रोहित पवारांच्या ट्विटने खळबळ!
कराळे मास्तर म्हणाले, त्या ठिकाणी काही ग्रामपंचायत कर्मचारीही बसून होते. एवढेच नाही तर ते कर्मचारी लॅपटॉप घेऊन बसले होते. त्यासाठी मी पोलिसांना फोन केला आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारण्यासाठी पुढे गेलो असता भाजपच्या पंकज भोयर यांचा यांचा गुंड प्रवृत्तीचा समर्थक सचिन खोसे धावत माझ्या अंगावर आला आणि मला मारहाण करू लागला. त्याने माझ्या पत्नीलाही शिवीगाळ केली. यात माझ्या लहान मुलीलाली लागलं, असा आरोप कराळे सरांनी केला
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत कराळे हे शरद पवार गटाचा प्रचार करत होते. अशातच त्यांना मारहाण झाल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.