प्रणिती शिंदे भाजपची बी टीम, त्यांनी केसाने गळा कापला; अपक्षाला पाठिंबा दिल्यानं शरद कोळी संतापले

  • Written By: Published:
प्रणिती शिंदे भाजपची बी टीम, त्यांनी केसाने गळा कापला; अपक्षाला पाठिंबा दिल्यानं शरद कोळी संतापले

Sharad Koli : सोलापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेसने ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील (Amar Patil) यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज कडादी (Dharmaraj Kadadi) यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळं ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींनी प्रणिती शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. प्रणिती शिंदे या भाजपची (BJP) बी टीम म्हणून काम करत असून त्यांनी भाजपशी आतून हातमिळवणी केल्याचा आरोप शरद कोळींनी (Sharad Koli) केला.

मोठी बातमी! बीड जिल्ह्यात मतदान केंद्रावरच अपक्ष उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू 

प्रणिती शिंदेंनी सोलापूर दक्षिण मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मराज कडादी यांना मतदानाच्या दिवशी पाठिंबा जाहीर केल्यानं कोळींनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी आहे, यापुढं तुम्हाला खासदारकी मिळणार नाही, असा इशारा कोळींनी दिला आहे. शिंदे कुटुंबीयांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा केसाने गळा कापला आहे. भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांना निवडून आणण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अपक्षाला मत म्हणजे भाजपला मत आहे. आपले उमेदवार अमर पाटील असून त्यांनाच निवडून आणायचे आहे, असं आवाहनही कोळींनी केलं.

Maharashtra Election 2024: हेमा मालिनी ते रितेश देशमुख, ‘या’ सिने कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क.

पुढे बोलताना शरद कोळी म्हणाले, लोकसभेत भाजपच्या आमदारांनी मदत केल्यामुळं त्यांना निवडणूक आणण्यासाठी प्रणिती शिंदेंनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी सोलापूरचा विकास केला नाही. शिंदे कुटुंबीयांनी आमचे आभार मानण्याऐवजी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. हे लोक धोकेबाज निघाले, गद्दारांकडून काय अपेक्षा करायची असा सवालही शरद कोळी यांनी केला आहे.

दरम्यान, मतदानाच्या दिवशीच सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर दक्षिण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज कडादी यांना काँग्रेस पक्षाचा अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेने गडबड केली असून त्यांनी घाईघाईने सोलापूर दक्षिण मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केला असल्याचं शिंदे म्हणाले. हा पारंपारिकपणे काँग्रेसचा बालेकिल्ला असताना, एकदाच शिवसेनेचा उमेदवार निवडून आला, त्यावर त्यांनी मतदारसंघावर दावा केलाय, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube