Maharashtra Election 2024: हेमा मालिनी ते रितेश देशमुख, ‘या’ सिने कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Election 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली. मराठी चित्रपट-दिग्दर्शक व नाट्यदिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी बजावला मतदानाचा हक्क.

हेमा मालिनी आणि ईशा देओल ही मायलेकीची जोडी मतदान करण्यासाठी पोहोचलेली दिसली

प्राजक्ता माळीने मतदान करत चाहत्यांना कंटाळा न करता मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

तेजस्विनी पंडितनेही सकाळीच तिचा मतदानाचा हक्क बजावला.

अभिनेत्री मुक्ता बर्वेनेही मतदानाचा हक्क बजावला. त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाने मतदान करावं, असं आवाहन त्यांनी केलंय.

अभिनेता हेमंत ढोमेने मतदान केल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सायली संजीवने मतदान करत चाहत्यांनाही आवाहन केलं आहे.

अभिनेत्री स्पहा जोशीनेही मतदान झाल्याचं सांगत आपला फोटो सोशल मीडियावर टाकलाय.

महेश मांजरेकर यांनीही विधानसभेसाठी मतदानाचा हक्क बजावला.

झालं झालं..केलं केलं...असं आपल्या सोशल मीडियावर लिहित प्रशांत दामले यांनी आपण मतदान केल्याचं सांगत पोस्ट केली आहे.

बॉलीवूड दिग्दर्शक राकेश रोशन यांनीही मतदान केलं.

अभिनता रितेश देशमुख यांनीही मतदानाचा हक्क जबावला.
