Download App

Nitin Deshmukh : राज्य सरकार मुख्यमंत्री शिंदे नाहीतर फडणवीसच चालवतात…

राज्याचं सरकार मुख्यमंत्री एकनाश शिंदे नाहीतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच चालवतात, मुख्यमंत्र्यांकडेच अधिकार असतात पण एकनाथ शिंदे यांच्याकडे अधिकार नसल्याचा खोचक टोला ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी लगावला आहे. दरम्यान, आमदार देशमुखांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आज सकाळीच पाणी प्रश्नासाठी संघर्ष यात्रा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरी निघाली होती. यावेळी नागपूरच्या वेशीजवळ ही यात्रा अडवण्यात आली. यावेळी नितीन देशमुखांना पोलिसांनी अक्षरश: उचलून नेत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.

धक्कादायक अहवाल ! खारघर दुर्घटनेतील ‘ते’ मयत तब्बल सात तासांपासून..

आमदार देशमुख म्हणाले, याआधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अकोल्याच्या पाणी प्रश्नासाठी विदर्भाची बैठक झाली होती. या बैठकीत भारसाखळे आपल्या पक्षाशी गद्दारी करणारे असल्याचं देशमुखांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं.

मात्र, भारसाखळेंनी जरी गद्दारी केली असली तरी जनता आपली आहे, मी शिवसेनेचा नाहीतर राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीचा मुख्यमंत्री असल्याचं विधान ठाकरे यांनी केलं असल्याचं नितीन देशमुख यांनी सांगितलं.

Atiq-Ashraf च्या मारेकऱ्याची कबूली, हत्यारं देणाऱ्यांची सांगितली नावं

हाच फरक उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे. भारसाखळेंच्या पत्रावर आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी पाणी योजनेच्या कामाला स्थगिती दिली आहे. पाण्याच्या संघर्षासाठी आम्ही कुठंचं कमी पडलो नसून आम्हाला कमी पाडण्यात आलं आहे. पाण्यासाठी आंदोलन करुन लोकांच्या पायाला फोडं आलेले आहेत.

सामनातील अग्रलेख ते नागपूर सभेतील अजितदादांचे भाषण, संजय राऊत थेट बोलले

माझ्या मतदारसंघाचा पाण्याचा प्रश्न सोडवा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. मी माझ्या मतदारसंघासाठी पाण्याचा संघर्ष सुरुच ठेवणार असून सर्वांनाच सोबत घेऊन जनतेचे प्रश्न सोडवणार असल्याचं ठामपणे देशमुख यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पाण्यासाठी आमदार नितीन देशमुख देखील जनतेसोबत रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करत होते. यावेळी पोलिसांनी त्यांना आंदोलन मागे घेण्याची अनेकदा विनंती केली. पण देशमुख नागपूरमध्ये जाण्याच्या आणि आंदोलन करण्याच्या मुद्द्यावर ठाम होते.

Tags

follow us