धक्कादायक अहवाल ! खारघर दुर्घटनेतील ‘ते’ मयत तब्बल सात तासांपासून..

धक्कादायक अहवाल ! खारघर दुर्घटनेतील ‘ते’ मयत तब्बल सात तासांपासून..

Maharashtra Heat Stroke Death : खारघर येथील महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) पुरस्कार कार्यक्रमात उष्माघाताच्या झटक्याने 14 जणांचा बळी गेला. या दुर्घटनेमुळे राज्य सरकारवर संतप्त टीका होत असतानाच आता या मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा पोस्ट मॉर्टम अहवाल आला आहे. या अहवालात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा करण्यात आला आहे. या अहवालामुळे राज्यात पुन्हा एकदा वाद होतील अशी चिन्हे दिसत आहेत.

या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या 14 पैकी 12 जणांनी सहा ते सात तासांपासून काहीच खाल्लेले नव्हते, असे या अहवालात म्हटले आहे. दुसरे महत्वाचे म्हणजे यातील काही जणांना आधीपासूनच काही व्याधी होत्या. ज्यात वेळेवर न खाणे आणि रणरणते ऊन याची भर पडली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

या कार्यक्रमता उन्हात बसलेल्या लोकांना पाण्यानेही काहीच फरक पडला नसता. त्यांनी खरी गरज सावलीचीच होती, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम ज्या ठिकाणी होता तेथे आदल्या दिवशी काही अधिकारी पाहणी करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनाही उन्हाचा त्रास झाला होता. मात्र, त्यांनी ही गोष्ट वरिष्ठांच्या कानावर घातली नाही असे आता समोर येत आहे.

Market Committee elections : श्रीगोंदा बाजार समितीसाठी पाचपुते-नागवडे कट्टर विरोधक एकत्र

सरकार आले ताळ्यावर

खारघर येथील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने (Heat Stroke) मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 14 वर पोहोचली आहे. रणरणत्या उन्हात तासनतास बसल्याने अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यातच 14 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर सात जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर आता राज्य सरकारला उपरती झाली असून सरकारने काही महत्वाचे निर्देश दिले आहेत.

भरदुपारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे दुपारच्या वेळी मोकळ्या जागेत कोणतेही कार्यक्रम घेऊ नयेत अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. जोपर्यंत उन्हाची स्थिती आहे तोपर्यंत दुपारच्या वेळात असे कार्यक्रम घेऊ नयेत. दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत खुल्या जागेत कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube