Ramdas Tadas Daughter in laws Serious Allegations : वर्धा मतदार संघामध्ये ( Wardha Constituency ) महायुती आणि भाजपची डोकेदुखी वाढली आहे. याचं कारण म्हणजे वर्धा मतदार संघामध्ये भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेल्या रामदास तडस ( Ramdas Tadas ) यांच्याविरुद्ध त्यांच्या सुनेने अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता वर्धा मतदारसंघात सासरे विरुद्ध सून अशी लढत होणार आहे. मात्र या दरम्यान तडस यांच्या सून पूजा तडस यांनी थेट पत्रकार परिषद घेत रामदास तडस यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर अनेक गंभीर आरोप ( Serious Allegations ) केले आहेत.
नागपूरमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये पूजा यांच्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यादेखील उपस्थित होत्या. त्यावेळी बोलताना पूजा तडस यांनी अनेक गंभीर आरोप केले. त्यामध्ये त्या म्हणाल्या की, रामदास तडस यांनी स्वतःच्या मुलाला फक्त बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी माझ्याशी लग्न करून दिले.
‘ॲनिमल’ नंतर आता अजय देवगणचा ‘मैदान’ सिनेमावर जावेद अख्तर पुन्हा बोलले
मात्र त्या घरात मला अत्यंत वाईट वागणूक दिली गेली. ज्या फ्लॅटवर मी राहते तिथे फक्त उपयोगाची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला. त्यात मला झालेल्या बाळाची देखील डीएनए टेस्ट कर अशी मागणी केली गेली. त्यांच्या घरी गेले असता मला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. आता तर माझा फ्लॅट विकून मला बेघर करण्यात आलं आहे. तडस यांनी मुलाला बेदखल केल्याचं केवळ ते सांगतात. मात्र त्याला घरात ठेवून घेतात आणि मला मात्र घराबाहेर काढलं जातं.
‘अजितदादांनी नाशिकची जागा मागून घेतली, तिकीट मलाच मिळणार’; भुजबळांचा दावा आणखी पक्का
एकीकडे मोदी संपूर्ण देशाला परिवार मानत आहेत. मात्र त्यांच्यात खासदाराकडून महिलांना अशा प्रकारची वागणूक मिळत आहे. त्यामुळे जेव्हा तडस यांच्या प्रचारासाठी मोदी वर्ध्यामध्ये येणार आहेत. त्यावेळी मला त्यांना एकच विनंती करायची आहे. मी तुमच्या परिवारातील एकमेकाशी मला न्याय द्या, माझ्या बाळाला द्या. असं म्हणत आपल्या बाळाला कडेवर घेत पूजा यांनी हे आरोप केले आहेत. त्यामुळे एकीकडे त्या अपक्ष निवडणूक लढणार आहेत. त्यात असे आरोप केल्यानंतर या मतदारसंघात भाजप आणि तडस यांची डोकेदुखी वाढली आहे.