Download App

रिसोड मतदारसंघातील झनक घराण्याचे वर्चस्व संपुष्टात येणार? भावना गवळी आघाडीवर…

भावना गवळी (Bhavana Gawli) आघाडीवर असून आठव्या फेरीत त्यांना 21 हजार 538 मते मिळालेली आहेत.

  • Written By: Last Updated:

Risod Assembly Election Result 2024: रिसोड विधानसभा मतदारसंघात यंदा सत्ता परिवर्तन होण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निवडणुकीच्या कलांमध्ये शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी (Bhavana Gawli) आघाडीवर असून आठव्या फेरीत त्यांना 21 हजार 538 मते मिळालेली आहेत. कॉंग्रेसचे अमित झनक (Ameet Zanak)1 हजार 303 मतांनी पिछाडीवर आहेत.

Parli Vidhan Sabha Result : परळीत धनंजय मुंडेंचीच हवा; तब्बल 50 हजारांनी मिळवला विजय 

रिसोड हा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षापासून झनक घराण्याचे वर्चस्व आहे. त्यामुळे यंदा काँग्रेसकडून विद्यमान आमदार अमित झनक यांनाच उमेदवारी देण्यात आली होती. सध्या अमित झनक हे पिछाडीवर आहेत. झनक केवळ 1 हजार 303 मतांनी पिछाडीवर आहेत. या निवडणुकीत गवळी आणि झनक यांच्यात चुरसीची लढत पाहायला मिळत आहेत.

तर अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख हे तिसऱ्या स्थानी असून त्यांनी 18 हजार 012 मते मिळाली आहेत. तर वंचितच्या प्रशांत गोळेंना 5 हजार 652 मते मिळालेली आहेत. तर विष्णूपंत भुतेकरांना अवघी 119 मते मिळाली आहेत.

राधाकृष्ण विखे पाटलांचा करिष्मा; सलग सातव्यांदा विधानसभेत जोरदार एन्ट्री 

रिसोड मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व आहे. 2009 पासून काँग्रेसने रिसोडमध्ये सलग विजय मिळवला आहे. 2009 च्या निवडणुकीत सुभाषराव झनकांनी 51,234 मते मिळवत विजय मिवळला होता. तर 2014 आणि 2019 च्या निवडणुकीतही अमित झनक यांनी काँग्रेसची परंपरा कायम ठेवली होती.

महायुतीची 220 जागांवर आघाडीवर
आतापर्यंत महायुती तब्बल 220 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 127 जागांवर आघाडीवर आहे. तर शिंदे गट 57 जागांवर आघाडीवर आहे. तर अजित पवार यांची राष्ट्रवादी 36 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं फडणवीस मुख्यमंत्रिपदी येण्याचा मार्ग मोकळा झाला.

follow us