शिंदे गटाची दुसरी यादी जाहीर: वरळीतून मिलिंद देवरा, भावना गवळींनाही तिकीट

  • Written By: Published:
शिंदे गटाची दुसरी यादी जाहीर: वरळीतून मिलिंद देवरा, भावना गवळींनाही तिकीट

Mahrashtra Assembly election: विधानसभेसाठी महायुतीमधील जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेने (shivsena) वीस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. मुंबईतील वरळी मतदारसंघात राज्यसभा खासदार मिलिंद देवरा (Milind Devara) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि मुरली देवरा, मनसेचे संदीप देशपांडे यांच्यामध्ये लढत होणार आहे. तर कुडाळमधून भाजपमधून आलेले निलेश राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रिसोडमधून भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभेत तिकीट कापल्यानंतर भावना गवळी यांना विधानपरिषद घेण्यात आले होते. त्यानंतर आता त्या विधानसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत.

आपल्याबरोबर असलेल्या अनेक जणांना शिंदे सेनेकडून तिकीट देण्यात आले आहेत. पालघरमधून राजेंद्र गावित हे रिंगणात उतरणार आहे. तर दिंडोशी मतदारसंघातून माजी खासदार संजय निरुपम यांना तिकिट देण्यात आले आहे. तर खासदार नारायण राणे यांचा मुलगा निलेश राणे यांना शिवसेनेत घेऊन त्यांना कुडाळ मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. त्यांची लढत कुडाळचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्याबरोबर होणरा आहे. ही फाइट टफ होईल. तर पुण्यातील पुरंदर मतदारसंघातून विजय शिवतारे यांनाही तिकीट देण्यात आले आहे.

आतापर्यंत शिंदे गटाला 65 जागा
महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आतापर्यंत 65 जागा मिळाल्या आहेत. पहिल्या यादीत 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली होती. बंडानंतर आपल्याबरोबर आलेल्या सर्व उमेदवारांना एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिलेली आहे. तर भाजपच्या दोन याद्या जाहीर झाल्या असून, पहिल्या यादीत 99 आणि दुसरा यादीत 22 असे 121 जागा भाजपने जाहीर केल्या आहेत.

उमेदवारांची यादी-
उमेदवाराचे नाव-
अक्कलकुआ-आमश्या पाडवी
बाळापूर-बळीराम भगवान शिरसकर
रिसोड-भावना गवळी
हदगाव-संभाराव उर्फ बाबूराव कदम कोहळीकर
नांदेड दक्षिण-आनंद तिडके पाटील (बोंडारकर)
परभणी-आनंद भरोसे
पालघर-राजेंद्र गावित
बोईसर-विलास तरे
भिवंडी ग्रामीण-शांताराम मोरे
भिंवडी पूर्व-संतोष शेट्टी
कल्याण पश्चिम-विश्वनाथ भोईर
अंबरनाथ-डॉ. बालाजी किणीकर
विक्रोळी-सुवर्णा करंजे
दिंडोशी-संजय निरुपम
अंधेरी पूर्व-मुरजी पटेल
चेंबुर-तुकारम काते
वरळी-मिलिंद देवरा
पुरंदर-विजय शिवतारे
कुडाळ-निलेश राणे
कोल्हापूर उत्तर-राजेश क्षीरसागर

follow us
  • fb
  • instagram
  • youtube