राधाकृष्ण विखे पाटलांचा करिष्मा; सलग सातव्यांदा विधानसभेत जोरदार एन्ट्री

Radhakrushna Vikhe Patil : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी आपला करिष्मा कायम ठेवलायं. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सलग सातव्यांदा दमदार विजय मिळवून ते विधानसभेत जाणार आहेत. शिर्डी मतदारसंघात महायुतीकडून राधाकृष्ण विखे पाटील तर महाविकास आघाडीकडून प्रभावती घोगरे रिंगणात होत्या. तर राजेंद्र पिपाडा यांनी अपक्ष निवडणूक लढवली. तिरंगी लढतीत राधाकृष्ण विखे यांनी दोन्ही उमेदवारांना धूळ चारत पुन्हा एकदा आपला गड कायम राखलायं. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यावर विखे घराणेचा प्रभाव आहे, असं विखेंनी या विजयातून दाखवून दिलंय.
महायुतीचे हेमंत रासने 5443 मतांनी पुढे…, पुणेमध्ये कोणाची आघाडी अन् कोणाची पिछाडी?
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विजयाबाबत अद्याप निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र माध्यमांच्या रिपोर्टनूसार विखे पाटील यांचाच विजय झाला असल्याची माहिती देण्यात आलीयं. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच विखे पाटील यांनी चांगलीच आघाडी घेतली होती, विशेष म्हणजे एकाही फेरीमध्ये विखे पाटील पिछाडीवर नसल्याचं दिसून आलं. शिर्डी मतदारसंघातील उमेदवारांची अधिकृत आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही, मात्र राधाकृष्ण विखे यांचाच विजय झाला असल्याचं निश्चित मानलं जातंय.