Download App

Road Accident : लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला! भीषण अपघातात 6 जण जागीच ठार

Road Accident : राज्यात रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. काही केल्या अपघात (Road Accident) कमी होत नाहीत अशी परिस्थिती आहे. आताही नागपूर जिल्ह्यातून (Nagpur News) भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली. या घटनेत कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अंगाचा थरकाप होईल अशी ही घटना होती. ही घटना नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील ताराबोडी परिसरात शुक्रवारी रात्री घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील मृतदेह ताब्यात घेतले. तसेच जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

Road Accident : टायर फुटला अन् डंपरला धडकून कार पेटली; 8 प्रवाशांचा जळून मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील मयत हे काटोल तालुक्यातील रहिवासी होती. काल नागपुरात लग्न समारंभ होता. हा कार्यक्रम आटोपून सर्वजण कारमधून आपल्या घरी निघाले होते. मध्यरात्रीच्या सुमारास सोनखांब आणि ताराबोडीच्या दरम्यान असताना समोरून येणाऱ्या ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच काटोल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीवर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. यानंतरच अपघाताचे खरे कारण समजू शकेल.

Beed Accident : देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी 

रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातही असेच घडले होते. गौरी गणपतीच्या सणासाठी कुटुंब पुण्याहून अमरावतीकडे निघाले होते. समृद्धी महामार्गावर असताना अचानक वन्यप्राणी आडवा आला. या प्राण्याचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात कार तीन वेळा पलटी झाली. कारची वेगात होती. त्यामुळे वेगातच पलटी झाली. या अपघातात कुटुंबातील महिला ठार झाली. तर अन्य तीन प्रवासी जखमी जखमी झाले. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्याकमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे.

Tags

follow us