Road Accident : ट्रक-ट्रॅक्टरचा भीषण अपघात! दोघेजण जागीच ठार

Road Accident :  ट्रक-ट्रॅक्टरचा भीषण अपघात! दोघेजण जागीच ठार

Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आताही सातारा जिल्ह्यातून अशीच एक भीषण अपघाताची (Road Accident) घटना समोर आली आहे. पुणे बंगळुरू महामार्गावर सोमवारी रात्रीच्या सुमारास ट्रक आणि उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर यांच्यात अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. मयतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. एक जण जखमी झाला आहे. या अघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

बातमी अपडेट होत आहे.. 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube