Sana Khan Murder Case : भाजपच्या नेत्या सना खान यांची हत्या करणारा अमित उर्फ पप्पू शाहू याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. भाजप नेत्या सना खान यांची आठ दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्ये हत्या झाली होती. हत्या करुन सनाचा मृतदेह हिरण नदीत फेकल्याची कबूली अमित शाहूने पोलिसांना दिली आहे. हत्येनंतर अमित शाहू फरार झाला होता. त्याचा जबलपूर आणि नागपूर पोलिस शोध घेत होते. अखेर शुक्रवारी त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मनोनित सदस्यपदी वसंत राठोड यांची पाचव्यांदा नियुक्ती!
मध्य प्रदेशास्थित जबलपूरमध्ये अमित शाहू हा अवैध धंद्यांमध्ये माहीर आहे. अवैध वाळू उपसा, अवैध दारु विक्रीची टोळी, यांसह अनेक प्रकारचे गुन्हे त्याच्यावर दाखल असून गुन्हेगारी क्षेत्रातील कुख्यात गुंड म्हणून त्यांची ओळख आहे. सना खान यांच्याशी त्याची ओळख झाली. त्यानंतर 2 ऑगस्ट रोजी सना खान नागपुरातून जबलपूरला अमितला भेटण्यासाठी गेल्या होत्या. सना यांना त्याला 50 लाख रुपये द्यायचे होते. मात्र, 2 ऑगस्टपासून सना खान यांचा फोन बंद होता.
‘इंडिया’ नावाच्या वापराविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
सना खान यांचा फोन बंद असल्याने त्यांच्या आईला संशयास्पद वाटल्याने त्यांनी तत्काळ मानकापूर पोलिसांत सना खान बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर अमित शाहू आपलं हॉटेल बंद करुन नोकरासह बेपत्ता झाल्याचं समजताच पोलिसांना त्याच्यावर संशय आला होता. त्यानंतर नागपूर पोलिसांनी नौकर जितेंद्र गौडला ताब्यात घेतलं.
जितेंद्र गौडने अमितच्या कारच्या डिक्कीत रक्त लागलेलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली त्यांनतर ती कार स्वच्छ केल्याचंही सांगितलं. दरम्यान, अटकेनंतर अमित शाहूने सना खान यांची हत्या करुन मृतदेह हिरण नदीत फेकल्याची कबूली पोलिसांकडे दिली आहे.