Download App

मंत्रीपदासाठी आपल्या नेत्यांपुढं डबक्यातली बेडकं ओरडतात, रोहित पवारांना हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

Rohit Pawar on Devendra Fadnavis : रोहित पवार हे राजकारणातील ऑरी आहेत, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती. यावरुन आमदार रोहित पवार यांनी राणेंवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की नितेश राणेंच नाव ऐकल्यावर मला कॉरी आठवते. कॉरी म्हणजे खाण. कॉरीमध्ये एक डबकं असतं. त्यामध्ये काही बेडकं असतात. पाऊस आला की ते ओरडायला लागतात. आता निवडणुका आल्यात. त्यामुळे काही राजकीय बेडकं ओरडायला लागली आहेत. त्यांना मंत्रीपदाचं पडलं आहे. त्यांच्या नेत्यांना काही बोललं की त्यांच्यासमोर आपलं आकाउंट चांगलं राहावं, यासाठी बेडकासारखं ओरडावं लागतं, अशी टीका रोहित पवार यांनी केली.

रोहित पवार यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेकडे (Sangharsh Yatra) लोकांनी पाठ फिरवली, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या टीकेला आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तरुणांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर युवा पिढी देवेंद्र फणवीसांकडे पाठ फिरवेल, असे म्हटले आहे.

एमआयडीसीवरुन राजकारण तापलं; तरुणांच्या भवितव्याशी खेळू नका, रोहित पवारांचा हल्लाबोल

रोहित पवार म्हणाले की देवेंद्र फडणवीसांना तरुणांच काय कळतं? आम्ही जेव्हा अधिवेशनात मुद्दा मांडला तेव्हा त्यांनी उत्तर काय दिलं? महाराष्ट्रातील तमात युवा सिरीयम नाहीत. पेपर फुटीचा मुद्दा ज्या पत्रकारांनी आणला, तेव्हा काय म्हणाले? ती बातमी खरी होती. ज्या पत्रकारांनी ही बातमी प्रसिद्ध केली त्यांच्यावर हक्कभंग आणतो.

तेच यांचे ‘पॉलिटिकल मास्टर्स’, शरद पवारांचे नाव घेत फडणवीसांनी किल्लारीकर यांना फटकारले !

जेव्हा केव्हा आपण त्यांना विचारतो तेव्हा ते खोटं बोलतात. ज्या व्यक्तीला तरुणांच काहीच पडलेल नाही. ते काय बोलणार? आम्ही दिलेल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर युवा पिढी फणवीसांकडे पाठ फिरवेल, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.

Tags

follow us