तेच यांचे ‘पॉलिटिकल मास्टर्स’, शरद पवारांचे नाव घेत फडणवीसांनी किल्लारीकर यांना फटकारले !

  • Written By: Published:
तेच यांचे ‘पॉलिटिकल मास्टर्स’, शरद पवारांचे नाव घेत फडणवीसांनी किल्लारीकर यांना फटकारले !

मुंबईः राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांपाठोपाठ आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनीही राजीनामा दिला आहे. त्यात मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य बालाजी किल्लारीकर यांनी एक नवा गौप्यस्फोट करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केलाय. मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) सर्वेक्षण गोखले इन्स्टिट्यूटमार्फत करण्यासाठी फडणवीस हे आग्रही आहेत, असा दावा किल्लारीकर यांनी केला. त्याला फडणवीस यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

MLA Disqualification प्रकरणी मोठी अपडेट; वेळापत्रक पुन्हा बदलले, ‘या’ दिवशी होणार सुनावणी

फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडी काळात राज्य मागासवर्ग आयोग तयार झाला आहे. तेव्हा तिन्ही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्यात सदस्य झाले. आम्ही मागासवर्ग आयोग तयार केला, तेव्हा त्यात अभ्यासक घेतले होते. महाविकास आघाडी सरकारने कार्यकर्त्यांचा त्यात भरणा केला. किल्लारीकर यांनी मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिल्यावर पहिली भेट शरद पवार यांची घेतली. सर्वेक्षण कसे करावे आणि त्याची पद्धती काय असावी, हे मागासवर्ग आयोग ठरवीत असते. सरकार नाही.

राम शिंदेंचा रोहित पवारांना मोठा धक्का, कर्जत एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द

मराठा आरक्षणाचा विषय पूर्णत्वास जाऊ नये आणि तो तसाच खोळंबलेल्या स्थितीत राहावा, अशी ज्या लोकांची इच्छा आहे, तेच यांचे ‘पॉलिटिकल मास्टर्स’ असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

राज्य सरकार मात्र मराठा आरक्षण देण्यावर ठाम आहे, आम्ही त्यासाठी संपूर्ण प्रयत्न करू.
खरे तर जो विषय माझ्याकडे नाही, त्यावर त्यांनी बोलणे हे पूर्णपणे राजकारण आहे. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देण्याची मला गरज वाटत नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

किल्लारीकर काय म्हणाले ?
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना किल्लारीकर म्हणाले, संपूर्ण समाजाचे सर्वेक्षण झाले पाहिजे. त्याच्या आधारे तुलनात्मक अभ्यासाच्या आधारे मराठा समाजाचा प्रश्न सोडविला गेला पाहिजे, ही भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होती. तसे आम्हाला सांगण्यात आले. पण फडणवीस यांची वेगळी भूमिका होती. त्यांनी या गोष्टीला आक्षेप घेतला. गोखले इन्स्टिट्यूटमार्फत सर्वेक्षणाचे काम केले जावे. हे काम संक्षिप्त स्वरुपाच व्हावे. व्यापक स्वरूपाचे नाही. म्हणजे ते लवकरात लवकर होईल, असे त्यांचे मत असावे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube