राम शिंदेंचा रोहित पवारांना मोठा धक्का, कर्जत एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द

राम शिंदेंचा रोहित पवारांना मोठा धक्का, कर्जत एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द

Ram Shinde on Rohit Pawar : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कर्जत एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे, या संदर्भात माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनी माहिती दिली आहे. यासंदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनात बैठक घेण्यात आली होती. या निर्णयाने आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना मोठा धक्का बसला आहे.

राम शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्योग मंत्र्याच्या दालनात ही बैठक झाली. या बैठकीत पाटेगाव ग्रामपंचायतीचा विरोध आहे यावर एकमत झाले. तसेच देशाला फसवलेल्या भगोडा निरव मोदीची जमीन प्रस्तावित एमआयडीसीत असल्यामुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की कर्जत तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या युवकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी उद्योगधंदे आले पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कर्जत तालुक्यातील एमआयडीसीसाठी लागणारी जमीनीचा प्रस्ताव 15 दिवसांच्या आत तयार करून शासनाला सादर करावा, असे स्पष्ट निर्देश दिले.

43 वर्षांपूर्वींच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार, संघर्ष यात्रेतून शरद पवारांचा राज्य सरकारला इशारा

मागील अधिवेशनापासून आमदार रोहित पवार कर्जतच्या एमआयडीसीसाठी सातत्याने पाठपुरावा आणि आंदोलन करत आहेत. यासाठी त्यांनी उद्योग मंत्र्यांची भेट घेतली होती. पण आमदार राम शिंदे यांचा या एमआयडीसीला विरोध होता. त्यामुळे ह्या प्रकल्पाला मंजूरी मिळाली नव्हती.

दिया कुमारी होणार राजस्थानच्या उपमुख्यमंत्री, मुघलांशी आहे खास कनेक्शन

एमआयडीसीत निरव मोदीच्या जमीनीवरुन कर्जत-जामखेडमध्ये राजकारण तापले होते. आमदार राम शिंदे आणि रोहित पवार यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द केल्याने पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube