Download App

लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय, तावडेंच्या विधानाने शिंदे-अजितदादांना धडकी

Vinod Tawde : महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप सामूहिक नेतृत्वात निवडणूक लढणार आहे. या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय सामूहिकरित्या घेण्यात येईल. भाजपने 2014 नंतर राजकारणाची दिशा बदलली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत (LokSabha elections) भाजपचे लक्ष लोकसभेच्या चारशे जागांचे आहे, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी म्हटले आहे.भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत निमित्ताने विनोद तावडे नागपुरात आले होते.

उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत गद्दारी केली. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यावे लागले. राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे आगामी निवडणुका महायुती म्हणून निवडणूक लढवणार आहेत. राज्यातील 48 पैकी 45 पेक्षा जास्त जागेंवर विजय होऊ, असे विनोद तावडे यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम, सरकारला आतापर्यंत भरपूर वेळ दिला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि भाजप युतीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले होते. पण उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत गद्दारी केली. यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले. शिंदे-फडणवीस सरकार राज्यात असतानाच अजित पवार आमच्यासोबत आले आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली नसती तर आज अजित पवार यांना आमच्यासोबत घेतले नसते, असे विनोद तावडे यांनी सांगितले.
‘उद्धव ठाकरेंचा मोर्चा फुसका बार, स्वत:ची निष्क्रियता झाकण्याचा प्रयत्न…’; बावनकुळेंची टीका

देशात इंडिया आघाडी तयार झाली. पण काँग्रेसच्या हेकेखोर भूमिकेमुळे त्यांच्यामध्ये फूट पडली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत आघाडीतील सहकारी स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील. आघाडीमुळे तसेही भाजपाला काही नुकसान होणार नव्हते. मोदी यांच्यावर जनतेच्या विश्वासामुळे भाजपाला यश मिळाले आहे. दाक्षिणात्य राज्यावर आम्ही जास्त लक्ष करत आहोत. कर्नाटक, आंद्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये भाजपच्या वाढणार आहेत. तामिळनाडूमध्ये युती झाली तर त्या ठिकाणी आम्हाला चांगले यश मिळेल, असा विश्वास विनोद तावडे यांनी केला.

Tags

follow us