Rohit Pawar on Ram Shinde : कर्जत एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द करण्यात आल्याची माहिती राम शिंदे (Ram Shinde) यांनी दिली आहे. यावरुन आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आक्रमक झाले आहे. राम शिंदेंनी एकतरी गुराळ उभा केलं आहे का? एमआयडीसीचं (Karjat MIDC) काय कळतं? असा सवाल रोहित पवारांनी केला आहे.
रोहित पवार म्हणाले की राम शिंदेंनी एकतरी गुराळ उभा केलं आहे का? गेल्या दीड वर्षापासून एमआयडीसीसाठी प्रयत्न करत आहे. आकशे एकरची एमआयडीसी आहे. वीस हजार लोकांना रोजगार मिळू शकतो. राम शिंदेंना एमआयडीसीचं काय कळंत?
मोठे उद्योग एमआयडीसीत यावेत यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती करुन राष्ट्रीय महामार्ग मंजूर करुन आणले. एमआयडीसी तिथं असल्याशिवाय दुसरीकडे होऊ शकत नाही. तो एकमेव इको सेन्सेटिव्ह झोन आहे. शंभर दोनशे एकरची एमआयडीसी केली तर अडचणीत जाताल. उगाच राजकारण करु नका. गरीबांचा विषय आहे. राजकारणाच्या नादात अनेक तरुणांचे भवितव्य अडचणीत आणले आहे.
43 वर्षांपूर्वींच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार, संघर्ष यात्रेतून शरद पवारांचा राज्य सरकारला इशारा
त्यांना एमआयडीसीतले काही कळत नाही. राजकारणाशिवाय काही कळत नाही. मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे, उद्योगमंत्र्यांना पत्र दिले आहे. त्यांना सांगितलंय. फक्त सही राहिली आहे. सही झाली की जीएआर निघतोय. तेवढं राहिलंय. सर्वे झालेत. सगळं झालंय. अजून काय पाहिजे, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
राम शिंदेंचा रोहित पवारांना मोठा धक्का, कर्जत एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द
संघर्ष यात्रा म्हणजे स्टंट आहे, अशी टीका राम शिंदेंनी केली होती. यावर रोहित पवार म्हणाले की जे लोकांत जातात, रस्त्यांवर उतरतात. त्या लोकांच आम्ही उत्तर देतो. जे लोक मंत्रीपद मिळवण्यासाठी नेत्यांच्या मागेपुढं करतात ह्या लोकांना आम्ही उत्तर देणार नाही. हे पदासाठी भांडणारे लोक आहेत, असा हल्लाबोल रोहित पवार यांनी केला.