अमरावती : महाविकास आघाडीच्या तिवसा मतदारसंघाच्या उमेदवार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात प्रचार दौरा करून नागरिकांशी थेट संवाद साधला. या मतदारसंघातील विकास कामे हीच माझ्या कार्याची पावती आहे. आगामी काळातही तिवसा मतदारसंघाच्या (Teosa) विकासासाठी प्रयत्नशील राहणार असून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलवणार आहे, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
यशोमती ठाकूरांच्या बालेकिल्ल्यात भाजपला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
यशोमती ठाकूर यांच्या प्रचारार्थ १५ नोव्हेंबर रोजी ईसापुर, जुनी भारवाडी, नवीन भारवाडी, ठाणाठुनी, चांदूर ढोरे, वरखेड, कुऱ्हा, दिवानखेड, माऊली जहागीर, वाघोली, डिगर गव्हाण या गावांत प्रचार दौरा काढण्यात आला. यशोमती ठाकूर यांनी मतदारसंघात केलेल्या अनेक विकासकामांची आठवण यावेळी त्यांनी मतदारांना करून दिली.
यशोमती ठाकूर यांचे हात बळकट, महाराष्ट्र युवक नाभिक महासंघाने दिला जाहीर पाठिंबा…
यशोमती ठाकूर यांच्या प्रचार दौऱ्यात प्रत्येक गावातील महिला व पुरुष मोठया संख्येने उपस्थिती होते. पदयात्रेचे प्रत्येक गावात नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. महिलांनी देखील यशोमती ठाकूर यांना ओवाळून त्यांचे जंगी स्वागत केले. पुष्पवृष्टी करून यशोमती ठाकूर यांच्या प्रति आदरभाव व्यक्त केला. दरम्यान, यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, विरोधकांना त्यांची जागा दाखवून देण्याची हीच योग्य वेळ आहे. खोटी आश्वासने देऊन ते जनतेची दिशाभूल करतील, पण, त्यांचा हा डाव हाणून पाडा, सत्याची साथ द्या, असे आवाहन त्यांनी केलं.
दरम्यान, वरखेड येथील श्री संत आडकूजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात यशोमती ठाकूर यांनी उपस्थिती लावून दर्शन घेतले.