Netizens troll Women who Played Dhol : सोशल मिडीयावर कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल ( Video Viral ) होणे. त्या व्हिडीओतील व्यक्तीवर कधी कौतुकाचा वर्षाव होणे तर कधी ट्रोलिंग होणे. यात काही नवीन नाही. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामधील महिलेला ( Women ) नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केलं आहे. हे ट्रोलिंग ( Netizens troll ) केवळ तिची खिल्ली उडवलेली नाही. तर तीला खडसावण्यात आले आहे. काय आहे हा व्हिडीओ? तसेच ही महिला का ट्रोल होत आहे? जाणून घेऊ सविस्तर…
Taapsee Pannu: बॉयफ्रेंडच्या लग्नानंतर अभिनेत्रीने पहिल्यांदा सोडलं मौन थेटच बोलली
मंगळवारी मराठीचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा सण पार पाडला. त्यानिमित्त महाराष्ट्राचं पारंपारिक वाद्य ढोल पथकांचं वादन करणं त्याला प्रोत्साहन देणं हे ठिकठिकाणी पाहायला मिळतं. यावेळी देखील एका महिलेचा ढोल पथकामध्ये ढोल वाजवतात व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाडव्याचा आहे. तसेच ही महिला पुण्यातील एका ढोल पथकाची सदस्य असल्याचं सांगितलं जात आहे.
कॉंग्रेस नेतृत्वाला ग्राउंड रिॲलिटीचे भान नसल्यानेच १७ जागा…; अशोक चव्हाणांची टीका
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील,काय स्टंटबाजी करतील ह्याचा काहीही नेम नाही !
०-३ वर्षांपर्यंत बाळाचे कान पूर्णपणे विकसित झालेले नसतात.मेंदूचा देखील पूर्ण विकास झालेला नसतो. त्यामुळे नैसर्गिक अवस्थेनुसार अशी लहान मुलं कर्णकर्कश आवाज सहन करू शकत नाहीत. pic.twitter.com/ShOjFuL10Y— 💪🔥 तेजा – Hitman प्रेमी ❤️👑 (@Mayazayo) April 9, 2024
ही महिला ढोल वाजवत आहे. मात्र यावेळी तिच्या खांद्यावर तिचं दोन-तीन वर्षाचं मूल झोपलेलं आहे. आणि याच कारणामुळे या महिलेचं सध्या प्रचंड ट्रोलिंग सुरू आहे. नेटकऱ्यांकडून म्हटलं जात आहे की, आपली जिद्द पूर्ण करण्यासाठी लहान मुलाला त्रास देणे अमानवी आहे. लहान मुलांना वयाच्या तीन वर्षापर्यंत लहान मुलांचे कान आणि मेंदू पूर्ण विकसित झालेले नसतो. त्यामुळे अशा अवस्थेत लहान मुलांना कर्णकर्कश आवाजात ठेवणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे बाळ बहिर होऊ शकतो. तर काहींनी म्हटलं आहे. ही महिला केवळ घेऊन आणि प्रसिद्धीसाठी आपल्या बाळाला त्रास देत आहे. तर काहींनी हात जोडून असे स्टंट नकरण्याची विनंती केली आहे.
लहान मुलांवर कर्णकर्कश आवाजाचा नेमका काय परिणाम होतो?
कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुलांच्या श्रवणशक्तीवर परिणाम होतो. संशोधनात असं समोर आलं आहे की, 85 डेसिबल किंवा त्याहून अधिक मोठा आवाज लहान मुलांना नुकसान पोहोचवतो. त्यामुळे मुलांना कर्णकर्कश आवाजाशी येणार संपर्क जसे की, डीजे, टीव्ही, मोबाईल, व्हिडिओ गेम्स हेडफोन्स शक्य तितका टाळणे गरजेचे आहे. यामध्ये असे देखील सांगितले जाते की, लहान मुलांनी कर्णकर्कश आवाज एका दिवसात एक तास ऐकणे सुरक्षित आहे. मात्र तो देखील एक तास सातत्याने नसावा. अन्यथा लहान मुलांमध्ये तात्पुरते किंवा कायमची श्रवण शक्ती कमी होणे, त्यांच्या भाषेच्या विकासावर नकारात्मक प्रभाव पडणे त्यांचा बौद्धिक विकास कमी होणे या समस्या उद्भवू शकतात.