Ajit Pawar On Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डेडलाईनही सांगितली आहे. राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन अजित पवारांनी दिले आहे. ते म्हणाले की, जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात राज्य सरकारने तीन सदस्यांची समिती स्थापन केली होती, समितीने आपला अहवाल राज्य सादर केला आहे. जुन्या पेन्शनसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून, येत्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज (दि. 12) विधान परिषदेत दिले.
दिशा सालियान मृत्यू प्रकरण : ठाकरे-फडणवीस राजकीय सूडनाट्य, अंक पाचवा!
विधान परिषदेत नियम 101 अन्वये, जुन्या पेन्शनसंदर्भात विशेष उल्लेखाद्वारे उपस्थित मुद्यावर सरकारतर्फे माहिती देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात केंद्र सरकारस्तरावर सुध्दा वेगळा विचार सुरु आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेतन, महागाई भत्ता यासंदर्भात केंद्र सरकारने वाढ केल्यानंतर राज्य सरकार सुध्दा त्याच पध्दतीने वाढ करत असते. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात केंद्र सरकारने निर्णय घेतल्यास त्याच धर्तीवर राज्यात सुध्दा निर्णय घेण्यात येईल.
Rajasthan : मोदी शाहंच्या मनाचा अंदाज लागेना; पहिल्यांदा आमदार झालेले भजनलाल शर्मा थेट CM
जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सुबोधकुमार, के. पी. बक्षी आणि सुधीर श्रीवास्तव या तिघांची समिती स्थापन केल्यानंतर त्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. त्याचबरोबर देशातील ज्या राज्यात जुन्या पेन्शन योजनेबाबत निर्णय घेण्यात आला आहे, त्याची माहितीही मागविण्यात आली आहे. ती माहिती आल्यानंतर त्याबाबतचा अभ्यास करण्यात येईल. जुन्या पेन्शन योजनेबाबत राज्य सरकार सकारात्मक असून येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिले.
‘पेन्शनसाठी सत्ताधाऱ्यांना टेन्शन द्या : उद्धव ठाकरे
जुनी पेन्शन योजना लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी जुनीच असून, नागपूर येथे हिवाळी अधिवेशादरम्यान कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. या आंदोलनाला आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भेट देत पाठिंबा दिला. मी मुख्यमंत्री असतो तर, तुमची मागणी नक्कीच पूर्ण केली असती असे ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी जुन्या पेन्शनसाठी सरकारमधील लोकांना टेन्शन द्या, असे आवाहन आंदोलकांना केले. आज मी मुख्यमंत्री नाही. माझा पक्ष आणि चिन्ह चोरलं आहे. मुख्यमंत्री असतो तर, तुमची मागणी नक्कीच पूर्ण केली असती. पण आज काहीही नसताना तुम्हाला विश्वास आणि ताकद द्यायला आलो असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले.
जुन्या पेंशन योजनेसंदर्भात सुबोधकुमार, के. पी. बक्षी आणि सुधीर श्रीवास्तव या तिघांची समिती स्थापन केल्यानंतर त्या समितीनं आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. त्याचबरोबर देशातील ज्या राज्यात जुन्या पेंशन योजनेबाबत निर्णय घेण्यात आला आहे, त्याची माहितीही मागविण्यात आली आहे. ती… pic.twitter.com/jDtuLisR1L
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 12, 2023