दिशा सालियान मृत्यू प्रकरण : ठाकरे-फडणवीस राजकीय सूडनाट्य, अंक पाचवा!
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadavis) हे कधीकाळी एकमेकांचे सहकारी होते. असे सांगूनही आता पटणार नाही. या दोघांमधील अबोला हा दुराव्यात बदलत गेला. हा दुरावा आता एका राजकीय सूडनाट्याकडे वळण घेताना दिसत आहे. ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मेव्हण्यांवर केंद्रीय यंत्रणांचे छापे पडणे, रश्मी ठाकरेंच्या अलिबागच्या बंगल्यांचा विषय निघणे असे सारे प्रकार घडले. (written order has been given to the police to investigate Aditya Thackeray in the Disha Salian suicide case)
अभिनेता सुशांतसिंग याच्या आत्महत्येनंतर तर ठाकरे कुटुंबीयाला त्यातही आदित्य ठाकरे यांना व्हिलन ठरविण्याचा मोठा प्रयत्न झाला. याला निमित्त ठरले सुशांतसिंगची मॅनेजर दिशा सलियान हिचा मृत्यू. हाच मृत्यू आदित्य ठाकरेंची अद्याप पाठ सोडत नसल्याचे शिंदे सरकारच्या निर्णयावरून दिसत आहे.
आता या प्रकणात आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्याचे लेखी आदेशच पोलिसांना दिले आहेत. हा निर्णय गृहखात्याने म्हणजे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच घेतला आहे. ही चौकशी ओपन करून आदित्य ठाकरेंना अडकविण्याचा तर प्रयत्न नाही ना, अशीच शंका आहे. पण सोबतच ठाकरेंनी फडणविसांना मुख्यमंत्रीपदी बसू दिले नाही, याचा सूड अद्याप बाकी असल्याचे या घडामोडींवरून दिसते.
ठाकरे-फडणवीस राजकीय सूडनाट्य, अंक पाचवा!
ठाकरेंनी 2019 मध्ये भाजपला पाठिंबा न देता स्वतः मुख्यमंत्री बनले आणि हे राजकीय सूडनाट्य सुरू झाले. हा नाट्याचा पहिला अंक होता. ईडीचे छापे `मातोश्री`च्या निकटवर्तीयांवर पडले हा दुसरा अंक ठरला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अभिनेता सुशांतसिंह याची आत्महत्या आणि सालियाना हिचा मृत्यू याचे धागेदोरे ठाकरेंपर्यंत होते, असा आरोप हा तिसरा अंक होता. नंतर शिवसेनाच फोडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणे हा चौथा अंका झाला आता पाचवा अंक दिशा सालियान हिच्या मृत्यूप्रकरणी एसआयटी नेमून सुरू झाला आहे.
दिशाचा मृत्यू अन् आदित्य ठाकरेंवर आरोप :
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा 8 जून 2020 रोजी मृत्यू झाला होता. त्यापूर्वी सहा दिवस आधी त्याची मॅनेजर दिशा सालियान हिने आत्महत्या केली होती. मात्र,तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला गेला या सगळ्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावरही सातत्याने आरोप होत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशीचीही मागणी वारंवार केली जात होती. भाजप नेत्यांकडून आणि त्यातही राणे कुटुंबीयांकडून हे प्रकरण उचलून धरण्यात आले होते.
भुजबळांविरोधातील ईडीची याचिका मागे; उद्धव ठाकरे म्हणाले, कोणता चमत्कार केला?
यात आमदार नितेश राणेंनी अनेकदा आदित्य ठाकरेंवर थेट आरोप केले आहेत. त्यांच्या नार्को टेस्टचीही मागणी केली होती. तर एकनाथ शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आरोप केला होता की, सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्या फोनवर एयू नावाने 44 वेळा फोन आला होता. बिहार पोलिसांच्या म्हणण्यानुसार एयू म्हणजे आदित्य आणि उद्धव ठाकरे असा दावाही शेवाळेंनी केला आहे.
28 वर्षीय दिशा सालियनच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल दाखल केला होता. ऑगस्ट 2021 मध्ये पोलिसांनी या प्रकरणी क्लोजर रिपोर्टही दाखल केला. या प्रकरणात कटाचा कोणताही पुरावा मिळालेला नसल्याचे म्हणत 2021 च्या सुरुवातीला पोलिसांनी तपासही बंद केला होता. शिवाय सुशांतसिंगच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने सुद्धा दिशा सालियनच्या मृत्यूला अपघात असल्याचे म्हटले होते.
एसआयटी चौकशीची घोषणा :
दिशाच्या कुटुंबीयांनीही मुलीच्या मृत्यूमागे कोणताही घातपात नसल्याचे म्हणत बदनामी थांबविण्याची विनंती केली होती, अन्यथा कोर्टात जाण्याचा इशाराही दिला होता. पण यानंतरही या प्रकरणात सातत्याने आदित्य ठाकरेंवर आरोप केले जात आहे. नारायण राणे यांनी तर आदित्य ठाकरे यांनीची तिच्यावर अत्याचार केले आणि तिची हत्याही केली, असा थेट आरोप केला होता. गतवर्षी अधिवेशनाह हा मुद्दा प्रचंड गाजला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात एसआयटी चौकशीची घोषणा केली होती.
एसआयटीची स्थापना अन् चौकशीचे आदेश :
आता पुन्हा एकदा हा मुद्दा तापला आहे. या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे आणि आता एसआयटीला आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यासाठी लेखी आदेश दिले असल्याचे बोलले जात आहे. ही चौकशी सुरु झाल्यास ऐन निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे यांना नव्या अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे बोलले जात आहे.
Rajasthan : मोदी शाहंच्या मनाचा अंदाज लागेना; पहिल्यांदा आमदार झालेले भजनलाल शर्मा थेट CM
गत चार वर्षांच्या काळात कधी एसटी आंदोलन, कधी श्रीधर पाटकर प्रकरण, कधी राणांचे आंदोनल तर कधी कंगनाची वक्तव्यातून ठाकरेंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतरच्या काळात शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे-भाजपमधील दुरावा आणखी वाढला. मधल्या काळात हा दुरावा कमी होऊन ठाकरे-भाजपमधील वैर कमी झाल्याच्या चर्चा होत्या. पण आता या प्रकरणातील नव्या आरोपांमुळे आणि एसआयटी चौकशीच्या आदेशामुळे ठाकरे-भाजपमधील वैर कायम आहे असेच म्हणायला हवे.