Download App

मोठी बातमी : अजितदादांचं टेन्शन संपलं; शिवतारेंची बारामती मतदारसंघातून माघार

  • Written By: Last Updated:

Vijay Shivtare Back Out From Baramati Loksabha Election : अजितदादांविरोधात बारामतीमध्ये बंड पुकारलेल्या विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) अखेर बारामती मतदारसंघामधून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवतारेंच्या या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवासांपासून टेन्शनमध्ये असलेल्या अजितदादांनी सुटकेचा निश्वास सोडला असून शिवतारे यापुढे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवतारेंच्या माघारीमुळे आता बारामतीत सुनेत्रा पवार विरूद्ध सुप्रिया सुळे यांच्यात लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. गुंजवणीतील पाणी पुरंदरला देणार असल्याचं आश्वासन सीएम शिंदे (Eknath Shinde) आणि डिसीएम फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहे त्यामुळे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे शिवतारेंनी स्पष्ट केले आहे.

Letsupp Special शिवतारेंनी स्वतःच आग लावली…. मग ती विझली कशी? जाणून घ्या इनसाईड स्टोरी!

शिवतारे म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या तिखट प्रतिक्रिया मला ऐकाव्या लागल्या पण कार्यकर्त्यांना मी समजावून सांगितल्यानंतर कार्यकर्त्यांनी समजून घेतले. मी लढण्यामागे राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप असे अनेक पदाधिकाऱ्यांनी मला रेटा दिला होता. मात्र, यामुळे मुख्यमंत्री आणि महायुतीची अडचण होत असल्याची जाणीव मला झाल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांमुळेच मी माघार घेतली. माझ्या काही प्रमुख मागण्या होत्या आणि त्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मान्य केल्या आहेत. यात गुंजवणीच्या पाण्याबाबत प्रामुख्याने मागणी केल्याचे शिवतारे म्हणाले. याशिवाय पुरंदर तालुक्यातील काही गावासाठीच्या योजना कार्यन्वित करण्यासाठी मागणी केली असून, आमदार, खासदार होण्यापेक्षा मी अनेक प्रकल्प मंजूर करून घेतले आहेत.

अनंतराव थोपटेंचीही घेतली होता भेट

बारामतीमध्ये सुत्रेना पवार विरूद्ध सुप्रिया सुळे अशी थेट लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. परंतु, शिवतारेंनी तिकीट न मिळाल्यास अपक्ष मैदानात उतरण्याचा मानसं व्यक्त केला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे बारामतीत तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. एवढेच नव्हे तर, शिवतारेंनी बारामती काबीज करण्यासाठी 44 वर्ष जुना वैरी म्हणजेच अनंतराव थोपटेंची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान शिवतारेंनी थोपटेंना जुन्या गोष्टी विसरू नका, आता आम्हाला साथ द्या अशी साद घातली होती. तसेच पुरंदरचे सर्व मतदार आपल्या मागे असल्याचं शिवतारेंनी यावेळी थोपटेंना सांगितलं होतं.

उदयनराजेंनी राष्ट्रवादीकडून सातारा खेचून कसा घेतला? त्याचीच ही Inside Story

मी माफ केलं पण जनता…

थोपटेंच्या भेटीदरम्यान शिवतारेंनी थोपटेंना शरद पवारांनी 1999 च्या निवडणुकीत तुम्हाला पाडलं होतं याची आठवण करून दिली होती. एवढेच नव्हे तर, अजितदादांनी जाहीर सभेत माझी लायकी काढली. त्यामुळे हा अपमान पुरंदरच्या मतदारांच्या जिव्हारी लागल्याचेही सांगितले होते.  त्यामुळेच येथील जनता आम्ही नोटाला मत देऊ, पण पवारांना मत देणार नाही असे ठामपणे सांगत असल्याचे थोपटेंना शिवतारेंनी सांगितले होते. तर, दुश्मनी राहिली बाजूला, मी यांना माफ केलं, पण जनता माफ करणार नाही हे ग्राऊंड रिअॅलिटीदेखील शिवतारेंनी थोपटेंना दाखवून देत याचसाठी मी निवडणूक लढवत असून, मला तुमचा आशीर्वाद हवा असल्याची साद शिवतारेंनी थोपटेंसमोर ठेवली होती.

लेट्सअप विश्लेषण : जरांगे-आंबेडकर ‘मविआ’ चा गेम करणार; 2019 च्या ‘वंचित’ फॅक्टरनं टेन्शन

…तर मी शिवसेनेतून बाहेर पडेल

काही दिवसांपूर्वी शिवतारेंवर कारवाई होणार असल्याच्या वृत्त समोर आले होते. त्यावर बोलताना शिवतारे म्हणाले होते की, माझ्यावर कारवाई होणार अशा बातम्या येत आहेत. बघू पुढे काय होते ते. काल्पनिक मुद्द्यांवर बोलणं योग्य होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मी लोकसभा निवडणूक लढणार आणि विजयी होणार असल्याचा विश्वास शिवतारेंनी व्यक्त केला होता. शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि जिंकावी अशी विनंती केली होती. तसेच असे न झाल्यास मी शिवसेनेतून बाहेर पडले असा इशाराही दिला होता. मात्र, आता शिवतारेंनी बारामतीच्या निवडणुकीतून माघार घेण्याचे जाहीर केल्याने बंडाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

follow us