Vijay Vadettiwar got Notice of Income Tax after OBC Mahamorcha : राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला होता. त्यामध्ये विरोधी पक्षासह सत्ताधारी ओबीसी नेते एकवटले होते. त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट केल्याच्या विरोधात महामोर्चा काढला होता. त्यामध्ये कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सक्रीय सहभाग होता. त्यानंतर आता मात्र त्यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. त्यावरून वडेट्टीवार संतापले आहेत. याबाबत त्यांनी गडचिरोलीमध्ये बोलताना माहिती दिली.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यामागे आयकर विभागाचा ससेमिरा लागला आहे.त्यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे.दरम्यान त्यांनी ओबीसी महामोर्चा काढला होता.त्यानंतर लगेचच त्यांना आयकर नोटीस आल्याचं समोर आलं आहे. याबाबत स्वतः विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना माहिती दिली.
कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या, मेष ते मीन बाराही राशीभविष्य…
यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की,दहा तारखेला ओबीसी महामोर्चा होता आणि नऊ तारखेला त्या अगोदरच मला इन्कम टॅक्सची नोटीस आली,पण मी घाबरणारा नाही काय कराल तुम्ही आम्ही संघर्षामधून निवडून आलेली माणसं आहोत. त्यामुळे आम्ही कोणालाही घाबरत नाही.असं म्हणत वडेट्टीवार यांनी या नोटीसवरून सरकारवर टीका आणि संताप व्यक्त केला आहे.
